आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डॉ. रश्मी शेट्टी यांच्या काही स्कीन केअर टिप्स

पुणे, ८ मार्च २०१८- या महिला दिनी स्वतःलाच काही वचन देण्याची वेळ आली आहे स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःचे लाड पुरवा आणि नेहमीच स्वतःवर प्रेम करा, कारण स्वतःला खास वाटून घेण्याकरिता तुम्हाला कोणत्याही एका दिवसाची गरज नाही.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डॉ. रश्मी शेट्टी महिलांना काही स्कीन केअर टिप्स देताना म्हणाली कि, स्वतःला वेळ देत स्वतःचे लाड पुरवा, काही वेळ स्वतःसाठी ठेवा. तुम्हाला नेहमी कराव्या वाटतात अशा गोष्टी करा. वाचायला सुरुवात केलेले एखादे पुस्तक पण जे तुम्ही वाचून पूर्ण करू शकला नाहीत, ते वाचून पूर्ण करा. खास प्रसंगी घालायला आणलेला एखादा सुंदर पोशाख पण घालायला मिळालेला नाही तो घालून मिरवा. तसेच सलूनमध्ये नको असलेले केस काढून टाकण्याकरिता तासन्तास वेळ घालवण्यापेक्षा वीनस वापरा. शरीरावरील नको असलेले केस काढताना कोणत्याही प्रकारचा त्रास, वेदना न होता मिळणारा मऊमुलायम स्पर्श तुम्हाला पुन्हापुन्हा वीनस वापरण्यास प्रवृत्त करेल. केस काढून टाकण्यासाठी ‘गो-टू’ ब्युटी म्हणजेच तात्काळ सौंदर्य मिळवण्याचे हे माझे एक साधन बनले आहे. माझ्या आधुनिक जीवनपद्धतीमध्ये हे अगदी सुयोग्य ठरते.

त्या पुढे म्हणाल्या कि, चांगली झोप मानसिक स्वास्थाकरिता आवश्यक असते, आपली जीवनशैली इतकी धावपळीची झाली आहे की, आपले पुरेशा झोपेकडे अगदी दुर्लक्ष झाले आहे. तुमच्या त्वचेसाठी तुम्ही एक उत्तम उपाय करू शकता तो म्हणजे गाढ झोप. झोपेत आपले शरीर दुरुस्त होत असते, अगदी तुमची त्वचा देखील. खोल श्वास व मेडिटेशन हे देखील त्वचेच्या स्वच्छतेकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, कारण श्वास आत घेणे व बाहेर सोडणे या क्रियेतून तुम्हाला तुमच्या त्वचेबाबत जागरुक होण्यास मदत होते आणि त्यामुळे ती ताजीतवानी होते.