Wednesday, 20/9/2017 | 2:44 IST+5
Punekar News

आंबेडकरी संघटनांना नक्षलवादी ठरविणाऱ्या खासदार अमर साबळे यांच्याविरोधात ” जोडे मारो आंदोलन “

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेल्या खासदारांच्या बैठकीत खासदार अमर साबळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात आंबेडकरी संघटनांना नक्षलवादी मदत करीत असून आंबेडकरी चळवळीतील एक नेते यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असून ते सतत भाजप विरोधात प्रचार करतात अशा प्रकारचे बेजाबदार व बेताल वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण आंबेडकरी चळवळीत त्यांच्याबद्दल चीड व असंतोष निर्माण झाला आहे . या निषेधार्थ भीम आर्मी पुणे शहर शाखेच्यावतीने जिल्हाप्रमुख दत्ता पोळ यांच्या नेर्तृत्वाखाली बालगंधर्व चौकात  ” जोडे मारो आंदोलन ”  करण्यात आले .

वास्तविक खासदार अमर साबळे हे दलित जरी असले त्यांचा सामाजिक जन्मच संघ शाखेच्या विचारधारेत झाला असल्याने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ , आंदोलने आणि समाजाचे प्रश्न याबाबत ते अज्ञभिज्ञ आहेत . जात्यांध धर्मांध व संविधान विरोधी विचार प्रवाहाचा पगडा त्यांच्यावर असल्याने अशा प्रकारचे बेअक्कल विधान तेच करू शकतात .

त्यांच्या अशा आरोपांच्या प्रकारच्या आरोपामुळे बाबासाहेबाना स्वातंत्र्य , समता व बंधुतेचा विचार पुढे घेउन जाणाऱ्या समस्त आंबेडकरी चळवळीचा अपमान झाला असून त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी या विषयी पुरावे द्यावेत अन्यथा त्यांना आंबेडकरी तरुणाच्या रोषाचा सामना करावा लागेल . बाबासाहेबाची चळवळ बदनाम करून दलित तरुणांना नक्षलवादी ठरवून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याची भाजप , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासारख्या संघटनाची नियोजनबध्द योजना आहे . त्याचाच एक भाग म्हणून अमर साबळे यांच्या सारखा प्रामाणिक स्वयंसेवक अशा प्रकारची विधाने करीत आहे . त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तांना भीम आर्मी पुणे शहर जिल्हा शाखेच्या वतीने लेखी तक्रार सुध्दा देण्यात आली आहे .

भीम आर्मी या विधानाचा तीव्र निषेध करीत असून अमर साबळे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी या संदर्भात पुरावे द्यावेत असे जाहीर आवाहन भीम आर्मीच्यावतीने करण्यात आले आहे .

या आंदोलनात आंबेडकरी चळवळीतील नेते कृष्णा कांबळे , आबा सावंत , शरद घोडके , प्रदीप कांबळे , प्रकाश निंबाळकर , शब्बीर तांबोळी ,बाळासाहेब लालसरे , सुनील बेंगळी , मुकेश गायकवाड , संदीप शिंदे , महादेव खळगे , प्रिती पिल्ले , अप्प्पा आखाडे , श्रीकांत शेडगे , दीपक बलाढे,बळीराम शेजवळ , सदा देवनार , बाळासाहेब गायकवाड , करण गायकवाड , दलितानंद तांदळे , हुसेन राजनाळ , विवेक सावंत , धनंजय लोहार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .

Share With US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137

Advertise with US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137