औरंगाबाद जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक निकाल

औरंगाबाद, दि.23 (जिमाका)—-जिल्हयात जिल्हा परिषदेच्या 62 गटासाठी 16 फेब्रुवारी रोजी  मतदान होऊन त्याचा आज मतमोजणीने निकाल जाहीर करण्यात आला.

तालुकानिहाय व पक्षनिहाय तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

तालुका एकूण गट पक्षनिहाय निकाल
भारतीय जनता पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपाई अपक्ष
सोयगाव 3 1 1 1
सिल्लोड 8 4 4
कन्नड 8 3 3 1 1
फुलंब्री 4 3 1
खुलताबाद 3 3
वैजापूर 8 1 1 4 2
गंगापूर 9 4 4 1
औरंगाबाद 10 3 5 1 1
पैठण 9 1 7 1
एकूण 62 22 16 18 3 1 1 1

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री  तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी  एस. पी. सावरगावकर, हनुमंत अरगुंडे, श्रीमंत हारकर, रविंद्र परळीकर, श्रीमती अंजली धानोरकर, संदीपान सानप, डॉ. भारत कदम, श्रीमती संगीता सानप, श्रीमती मंजुषा मुथा व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बनकर, विनोद गुंडमवार, संतोष गोरड, श्रीमती संगीता चव्हाण, अरुण जऱ्हाड, श्रीमती सुमन मोरे, चंद्रकांत शेळके, सतीश सोनी, रमेश मुंडलोड यांनी मतमोजणी यंत्रणेसह मतमोजणी प्रक्रीया उत्कृष्टरित्या पार पाडली आहे. जिल्हयात कुठेही फेरमोजणीची वेळ आली नाही. शांततेत विना गडबड मतमोजणी झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना धन्यवाद दिले आहेत. याकामी पोलीस बंदोबस्त चोख ठेवल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नवीनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे देखील जिल्हाधिकारी यांनी आभार मानले आहेत.