गिरीश कर्नाड यांच्या जाण्याने कला, साहित्य आणि वैचारिक क्षेत्रात पोकळी – खासदार गिरीश बापट

पुणे : प्रख्यात विचारवंत,नामवंत अभिनेते-दिग्दर्शक, लेखक गिरीश कर्नाड यांच्या निधनाने साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

श्री. कर्नाड हे बहुआयामी  व्यक्तिमत्व होते. साहित्य, चित्रपट, रंगभूमी यासह वैचारिक क्षेत्रातही त्यांचे विशेष स्थान होते. कन्नड बरोबर मराठी चित्रपट तसेच नाटकांमधूनही त्यांनी काम केले. ज्ञानपीठ, कालिदास सन्मान, साहित्य अकादमी, संगीत अकादमी यांच्यासह विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. ययाति, तुघलक, नागमंडल, हयवदन यासारखी नाटके आण‍ि उत्सव या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी केलेली भरीव कामगिरी सदैव समरणात राहील. अशा या बहूआयामी व्यक्तीमत्वास माझी भावपूर्ण श्रद्धांजली.