डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ,२५००० भीमअनुयायींना अन्नदान , १०० पिशव्या रक्तदान शिबिरात जमा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त दलित पँथर महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करणाऱ्यास आलेल्या २५००० भीमअनुयायींना अन्नदान व १०० पिशव्या रक्तदान शिबिरात जमा करण्यात आल्या . या सामाजिक उपक्रमाचे उदघाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .सायंकाळी प्रसिध्द गायक अनिरुध्द बनकर यांचा प्रबोधनकार गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या १२७ व्यक्तींना “ पँथर भीमरत्न पुरस्कार ” प्रमुख पाहुण्याच्या हस्ते देउन सन्मानित करण्यात आले .

या सामाजिक उपक्रमाचे आयोजनासाठी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम , दलित पँथरचे कार्यकर्ते अल्ताफ सय्यद , इलियास शेख , किरण ठोगेपाटील , मुदस्सर शेख , अजय वंडगल , बाप्पू माने , सोनू सुतार , राजेंद्र नडगम , प्रिन्स कांबळे , अनमोल नडगम , कुणाल सुरवसे यांनी विशेष परिश्रम घेतले .

या रक्तदान शिबिरामध्ये १०० पिशव्या रक्त संकलित करण्यासाठी रेड प्लस ब्लड बँकेने विशेष सहकार्य केले . यावेळी रक्तदान केलेल्याना प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला . रक्तदान करणाऱ्या मध्ये युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . तर अन्नदानाचा दिवसभर सुरु होता . या अन्नदानाचा मोठ्या संख्येने भीमअनुयायींना लाभ घेतला . तसेच सायंकाळी प्रसिध्द गायक अनिरुध्द बनकर यांचा प्रबोधनकार गीतांचा कार्यक्रमास मोठ्या पप्रमाणावर गर्दी केली होती .