नागपूर येथे चंद्रनगर जलकुंभाचे लोकार्पण, नवीन जलकुंभामुळे ३५ हजार लोकसंख्येला मिळणार पिण्याचे पाणी

नागपूर : दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघातील चंद्रनगर परिसरात35 हजार लोकसंख्येला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलकुंभ बांधण्यात आला आहे. पाणी पुरवठ्याच्या पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले असून शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी इतरही टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा होणारे नागपूर हे देशातील पहिले शहर राहणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
चंद्रनगर येथे नागपूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या जलकुंभाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,महापौर श्रीमती नंदा जिचकार,आमदार सुधाकर कोहळे आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर शहरात वाढीव पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेचा जनतेला लाभ मिळावा तसेच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी चंद्रनगर परिसरात नागरिकांनी पुढाकार घेतला. त्या माध्यमातून चंद्रनगर येथे जलकुंभाची उभारणी करण्यात आली. या जलकुंभामुळे येत्या 30 वर्षापर्यत

30 वर्षापर्यत 35हजार नागरिकांना पाणीटंचाई भासणार नाही. केवळ चंद्रनगर नाही,तर शहरात अविरत पाणीपुरवठा केला जावा यासाठी शहरातील इतर भागात देखील जलकुंभाचे बांधकाम केले जात आहे. त्याद्वारे शहराला नियमित पाणीपुरवठा करता येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले,शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी जलकुंभाची आवश्यकता होती. ती आज पूर्ण होत आहे. या जलकुंभामुळे जनतेला यापुढे नियमित पाणीपुरवठा करता येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जलकुंभाचे पूजन करण्यात आले तसेच नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
जलकुंभाच्या बांधकामास मिळालेल्या सहकार्याबद्दल चंद्रनगरवासियांनी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सुधाकर कोहळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार नागपूर महानगर पालिका जलप्रदाय समिती सभापती विजय झलके यांनी मानले. यावेळी नागपूर महानगरपालिकाचे अधिकारी,लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.