पावसातही खासदार बापट यांच्या रॅलीला मोठा प्रतिसाद

पुणे: पुणे शहर लोकभा मतदार संघातून खासदार गिरीश बापट यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर मतदार संघातून अभिवादन रॅली काढण्यात येत आहे. या रॅली द्वारे खासदार गिरीश बापट मतदारांना अभिवादन करून त्यांचे आभार व्यक्त करत आहेत. आज वडगाव शेरी तसेच कॅन्टोमेंट बोर्ड भागातून रॅली काढण्यात आली.
यावेळी बोलताना खासदार बापट म्हणाले, देशाची भाजपाची सत्ता आल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली. या मुळे लोकांनी मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ठ बहुमत दिले. राज्यात ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याची मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने अनेक विकासकामे मार्गी लावली. यामध्ये पुणे मेट्रो, 24 बाय 7 पाणी पुरवठा, मुळा- मुठा नदी सुधार प्रकल्प, पीएमआरडीए ची स्थापना, वाहतूक समस्या सोडवण्यासाठी निर्माण केलेले रस्त्यांचे जाळे या सारखी अनेक विकासाची कामे करू शकलो.
या मुळे माझ्यावर लोकांनी विश्वास ठेवून मला 3 लाख 24 हजारांच्या विक्रमी मतांनी निवडून आलो. लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वाबद्दल त्यांना धन्यवाद देण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी मतदार संघातून अभिवादन रॅली काढण्यात येत आहे. शुक्रवारी कसबा पेठ आणि पर्वती या भागातून रॅली काढली तर आज पर्वती आणि कॅन्टोमेंट भागात रॅली काढली. या रॅली दरम्यान मान्सून ने हजेरी लावली. मोठ्या प्रमाणावर पाऊस येऊन ही कार्यकर्त्यांचा उत्साह कौतुकास्पद होता. नागरिकांचा ही या रॅलीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. पावसाच्या प्रत्येक थेंब जसा महत्वाचा आहे तसेच माझ्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे असे सांगत त्यांनी खासदार म्हणून लोकांचे केंद्रातील प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल. असे वचन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार जगदीश मुळीक,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, अनिल टिंगरे, स्मिता गलांडे, बापूसाहेब कर्णे गुरुजी, उमेश गायकवाड, महेश लडकत,दीपक पोटे, मनीषा लडकत,कलिंदा पुंडे,श्वेता गलांडे, मुक्ता जगताप, माजी नगरसेवक संदीप लडकत,आरपीआयचे बाळासाहेब जानराव,संतोष राजगुरू,किरण कांबळे, महेश पुंडे, दिनेश होले यांच्यासह कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते.