पिंपरीतील श्री शितळादेवी मंदिर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ संपन्न

पिंपरी (19 जून 2019) पिंपरीगावातील श्री शितळादेवी मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण बुधवारी करवीर पिठाचे श्रीमद्‌ जगद्‌गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते भक्तीपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी निमंत्रक नगरसेवक संदीप वाघेरे, माजी महापौर रंगनाथ फुगे, भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव वाघेरे, नगरसेविका सुलक्षणा धर, माजी नगरसेवक संतोष कुदळे, शिवाजी वाघेरे, सुरेश शिंदे, संतोष कुदळे, गणपत जाचक, चंद्रकांत गव्हाणे, प्रविण कुदळे, संजय गायखे, रमेश जाधव, दत्ता मासुळकर, वसंत दत्तोबा नाणेकर, किसन कापसे, चिंधाजी गोलांडेमामा, चंद्रकांत गव्हाणे, रामभाऊ कुदळे, हरीश वाघेरे, कैलास वाघेरे, राजेंद्र वाघेरे, अमित कुदळे, रंजनाताई जाधव आदींसह पिंपरी गावातील समस्त ग्रामस्त बहुसंख्य भक्त भाविक उपस्थित होते.
पिंपरीगावातील समस्त ग्रामस्थांच्यावतीने आयोजित केलेल्या या सोहळ्यात सोमवारी मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली होती. तसेच मंगळवारी व बुधवारी महासंकल्प, गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य पूजन, स्थलशुद्धी, उदकशांत, शांती होम, जलाधिवास, पुष्पाधिवास, धान्याधिवास, शैयाधिवास आणि मंगळवारी प्रासाद वास्तू मंडल स्थापना, मुख्य देवता स्थापना, कुंड संस्कार, नवग्रह स्थापना, ग्रह होम, वास्तू होम, पर्याय होम, सप्तसती पाठ व पूजा मंत्रा पुष्प आणि स्थापित देवता पूजन, कलश स्थापन, प्रायश्चित होम, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलाशारोहण समारंभ, पूर्णाहूती, महापूजा, महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सायंकाळी हजारों भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
————————–