पै कॉलेज ऑफ वेदा ‘ तर्फे आय.टी. ऑलिंपियाड चे आयोजन

पुणे :
पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्टस डिझाईन अँड आर्ट’ (VEDA) तर्फे ‘आय.टी. ऑलिंपियाड -2018’ चे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे ८ वे वर्ष आहे.
आयटीशी संबंधित आपले कौशल्य आणि ज्ञान संपादित करण्यासाठी विद्यार्थ्यांना आय.टी. ऑलिंपियाड हे उत्तम व्यासपीठ ठरू शकते, अशी माहिती ‘पै कॉलेज ऑफ वेदा’ चे प्राचार्य ऋषी आचार्य यांनी दिली.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळा आणि विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी १२ सप्टेबर २०१८ पर्यत करायची आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये आय.टी. ऑलिंपियाड होईल. ५ डिसेंबरला पारितोषिक वितरण होईल

.

ऑलिंपियाडची औपचारिक घोषणा आझम कॅम्पस येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी डॉ. पी. ए. इनामदार , पै. आय सी टी अकॅडमी च्या संचालक मुमताझ सय्यद, ‘पै कॉलेज ऑफ वेदा’ चे प्राचार्य ऋषी आचार्य, आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्य आयेशा शेख, स्वतंत्र जैन उपस्थित होते.