पोलीस शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

शनिवार, २१ ऑक्टोंबर, २०१७

मुंबई : पोलीस शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पचक्र वाहून शहिदांना अभिवादन केले.

नायगावच्या पोलीस मुख्यालयातील मैदानात झालेल्या हुतात्मा दिन मानवंदना व संचलन कार्यक्रमाला राज्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कर्तव्यावर असताना हौतात्म्य आलेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्मरण दरवर्षी २१ ऑक्‍टोबर रोजी करण्यात येते. या हुतात्मा दिनाच्या निमित्ताने वीरमरण आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्मरण केले.