भारतीय विद्या भवनमध्ये २८ मार्च  रोजी  ‘ स्वर वसंत ‘ संगीत कार्यक्रमाचे  आयोजन

पुणे : ‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत स्वर वसंत ‘ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार,दिनांक २८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. व्हायोलिन ,सरोद ,गायनाच्या माध्यमातून ‘वसंत ‘ ऋतूचे स्वागत करणाऱ्या रचना ,एकल प्रस्तुती सादर करण्यात येणार आहे .
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा ७२ वा कार्यक्रम आहे.
उर्वशी शाह प्रस्तुत हा कार्यक्रम ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रस्ता येथे होणार आहे, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली.
पंडित पार्थसारथी (सरोद ),अंजली सिंगडे -राव (व्हायोलिन ),पंडित रामदास पळसुले (तबला ),लीलाधर चक्रदेव (हार्मोनियम ) हे कलाकार सहभागी होणार आहेत . उर्वशी शाह गायन करणार आहेत .