मनजितसिंग विरदी फाऊंडेशन , खालसा चढ दि कला सेवादार व शीख समाज पुणे शहराच्यावतीने  शीख बांधवाकरीता केसरी चित्रपटाचे आयोजन

मनजितसिंग विरदी फाऊंडेशन , खालसा चढ दि कला सेवादार व शीख समाज पुणे शहराच्यावतीने प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार यांचा अभिनय असलेला केसरी हा चित्रपट शीख बांधवाना बंडगार्डन रोडवरील आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये मोफत दाखविण्यात आला . या चित्रपटाची सुरुवात आरदास करून करण्यात आली . यावेळी मनजितसिंग विरदी ,भोलासिंग अरोरा , अजितसिंग राजपाल , मनमित विरदी , मनप्रित विरदी , रिद्दीमा विरदी , सहेर विरदी ,राजवीरसिंग घई , नगरसेवक साईनाथ बाबर , पोलीस अधिकारी संजय दळवी , नगरसेवक प्रदीप गायकवाड , फईम शेख , बलबीरसिंग होरा , हरपालसिंग राजपाल , बच्चनसिंग कल्याणी , गुरुविंदरसिंग राजपाल , रणजितसिंग अरोरा , हरमिंदरसिंग अरोरा , सुरजितकौर राजपाल , चरणजितकौर खंडूजा , सुखजीतकौर अरोरा , कुलदीपसिंग बग्गा आदी मान्यवर व मोठ्या संख्येने शीख , पंजाबी व सिंधी बांधव उपस्थित होते .

यावेळी मनजितसिंग विरदी यांनी चित्रपटाच्या आयोजनाबद्दल सांगितले कि , केसरी रंग हा खालसा पंथाच्या स्वातंत्र्याचा व शौर्याचा रंग आहे . सन १८९७ च्या सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट अफगाण व पंजाब सीमेवर असलेला सारागढी किल्ला लढाईवर बेतलेला आहे. या लढाईत ब्रिटीश भारतीय सेनेच्या २१ शीख सैनिकांनी १० हजार अफगाणी सैनिकांना आपल्या तलवारीचे पाणी पाजले होते. ही लढाई भारताच्या इतिहासातील कठीण लढायांपैकी एक ठरली. हे ब्रिटीश भारतीय सेनेच्या २१ शीख सैनिकांचे शौर्य सर्वाना समजण्याकरिता या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी भोलासिंग अरोरा यांनी सांगितले कि .केसरीचित्रपटात माणुसकी , धर्म व जातीपाती न मानता सच्चा सेवक म्हणून लढले पाहिजे . आपण अन्यायाविरोधात लढले पाहिजे . आपण कुणासमोर झुकू नये . या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार यांच्या अभिनयातून त्याने ते दाखविले आहे . त्यामुळे या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते .