महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ‘ सुवर्णमहोत्सवास प्रारंभ

पुणे : खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या चोखंदळ पुण्यात सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचा सत्कार ‘महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ‘या शासकीय संस्थेमध्ये शुक्रवारी करण्यात आला .
‘महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ‘ च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त हा अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला होता .’पूना गेस्ट हाऊस’चे किशोर सरपोतदार ,’दोराबजीज’,’श्रेयस ‘ ,’गणेश भेळ’ यांच्यासह १५ व्यावसायिकांचा सत्कार ज्येष्ठ हॉटेल मॅनेजमेंट तज्ज्ञ राजन केळशीकर यांच्या हस्ते करण्यात आला .
श्री . नंदनवार (सहसंचालक ,विभागीय तंत्र शिक्षण कार्यालय ),कृष्णगोपाल (अध्यक्ष ,ट्रॅव्हल एजेंट्स असोसिएशन ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य आणि सुवर्णमहोत्सव उपक्रमाच्या प्रमुख संयोजक डॉ. अनिता मुदलियार यांनी स्वागत केले .
इन्स्टिट्यूट संचालक मंडळाचे सदस्य नाना नलावडे, समीर गाजरे, प्राध्यापक पुसेगावकर, प्रा. सचिन उपस्थित होते. इन्स्टिट्यूटच्या माजी प्राचार्य श्रीमती गांगुळी मॅडम यांच्या योगदानाचा सर्वांनी भरभरून उल्लेख केला.माजी कर्मचाऱ्यांच्या वतीने दगडू मामा यांनी ह्रद्य मनोगत व्यक्त केले.किशोर सरपोतदार यांच्यासह हॉटेल व्यावसायिकांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे मनोगत व्यक्त केले .
आजी -माजी विद्यार्थ्यांनी सुवर्णमहोत्सवानिमित्त फूड फेस्टिव्हल आयोजित केला.त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आवारातून मॉडेल कॉलनीत आलेल्या या इन्स्टिट्यूटच्या दैदीप्यमान प्रवासाचा सर्व वक्त्यांनी उल्लेख केला.सर्व आयोजन आजी -माजी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केले. शासकीय अभियांत्रिकीच्या आवारात म्हणजे आत्ताच्या महाराष्ट्र बँक,लोकमंगल शाखेसमोर फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूट या नावाने ही संस्था खूप लोकप्रिय होती, अनेक इंटरनॅशनल शेफ व हॉटेल व्यावसायिक या संस्थेने घडविले आहेत,याचा उल्लेख या कार्यक्रमात करण्यात आला .