महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र दि. 23 व 24 रोजी सुरु राहणार

पुणे, दि. 22 मार्च 2019 : थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र दि. 23 व 24 मार्चला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत.

पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांच्या रकमेचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी शनिवारी (दि. 23) व रविवारी (दि. 24) सार्वजनिक सुटी असली तरी पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.