Tuesday, 17/7/2018 | 11:36 IST+5
Punekar News

मालमत्ता तारण ठेवून कर्ज देण्याच्या प्रकरण घोटाळ्यातील निलंबित बँक अधिकारी अजित कमलाकर गोखले यांच्या विरोधात कडक शिक्षेच्या मागणीसाठी पुणे लष्कर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट विभागाच्यावतीने  “ मूक मोर्चा “

मालमत्ता तारण ठेवून कर्ज देण्याच्या प्रकरण घोटाळ्यातील निलंबित बँक अधिकारी अजित कमलाकर गोखले याना पुणे लष्कर न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी शिक्षा सुनावली बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज देण्याच्या प्रकरण घोटाळ्यातील निलंबित बँक अधिकारी अजित कमलाकर गोखले याना लष्कर पोलिसांनी गुरुवारी ११ जानेवारी २०१८ रोजी रात्री बाणेर रोड येथे अटक केली . याशिवाय केतन शहा , देवेंद्र पारीख , यांच्यावरहि गुन्हा दाखल केला आहे . परंतु हे तिघे फरार आहेत . या प्रकरणात पुनीत ग्रोव्हर व विनीत ग्रोव्हर यांनी लष्कर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे .

आज पुणे लष्कर न्यायालयात अजित कमलाकर गोखले यांना आणण्यात आले.त्यावेळी न्यायाधीश गुजर यांनी आरोपी अजित कमलाकर गोखले यांना पुढील तपासासाठी १६ जानेवारी २०१८ पर्यंत चार दिवसासाठी पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली . व त्यांचा जामीन नामंजूर केला .

यावेळी पुणे लष्कर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट विभागाच्यावतीने निलंबित बँक अधिकारी अजित कमलाकर गोखले यांच्या विरोधात कडक शिक्षेच्या मागणीसाठी मूक मोर्चा काढला . या मूक मोर्चामध्ये भ्रष्ट्र अधिकारी अजित गोखले याला शिक्षा झालीच पाहिजे , अजित गोखले याचा तीव्र निषेध अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी धरून निषेध नोंदविला . त्यामुळे शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट उपविभाग प्रमुख दुर्गेश परदेशी व उपविभाग प्रमुख किसन लोखंडे , विशाल जाधव , रितेश शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते .

शिवसेनेच्यावतीने लष्कर पोलिस ठाण्याला तक्रार अर्ज केला.लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर याना या प्रकरणातील आरोपीविरुध्द भारतीय दंड कलम ४२० , १२० ब , ४०६ , ४६८ , ४७१ , ३४ अन्वये एफ. आय. आर. नंबर ०२१२ / २०१७ प्रमाणे गुन्ह्याचा तपास करण्यात यावा . कारण अजित गोखले हा सी. बी. आय. तर्फे दाखल केलेले केस अजित गोखले विरुध्द शिवाजीनगर न्यायालय , सी. बी. आय. स्पेशल न्यायालयात दोन केस मॉडेल कॉलनी पुणे ब्रान्च व चार केस नाशिक सिटी ब्रान्च व स्पेशल केस नंबर २३ आणि २४ , ४४ , ४५ , ४६ ४७/ २०१६ हे सर्व सी. बी. आय. न्यायालयात दाखल आहे .त्यामध्ये चार्जशिट दाखल झालेली आहे . त्यामध्ये मुख्य आरोपी अजित गोखलेघोषित केले आहे . त्यामुळे शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट उपविभागप्रमुख दुर्गेश परदेशी व उपविभागप्रमुख किसन लोखंडे , विशाल जाधव , रितेश शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते .

Share With US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137

Advertise with US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137