माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या एच. आर. राठी मुलींच्या वसतिगृहात सत्यनारायणाची पुजा संपन्न

Punekar News's photo.पुणे दि. १९ – गणेशोत्सवादरम्यान अनेक जण सत्यनारायणाची पुजा करत असतात, मागील ५ वर्षांपासून मॉडेल कॉलनी येथील माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या एच. आर. राठी या मुलींच्या वसतीगृहात सत्यनारायणाची पुजा करण्यात येते. दरवर्षी यासाठी एक थीम घेऊन सजावट करण्यात येते. यावर्षी खेडेगावची थीम ठरवून त्याप्रमाणे सजावट करण्यात आली. या सजावटीत गायीचा गोठा, गावातील घर, शेत, मडकी बनवणारा कुंभार, जात्यावर धान्य दळनारी तसेच लोण्याला घोळणारी महिला इ. दृश्यांचा कृञिम देखावा तयार करण्यात आला आहे. या देखाव्या मागचा मुख्य हेतू “दूष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लाेकांचे जनजीवन समजून घेणे” हा आहे असे माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या अध्यक्षा किर्ती लढ्ढा यांनी सांगितले. ही सर्व सजावट वसतीगृहातील मुलींनीच केली. त्यासाठी मुलींची एक कमीटी गठीत करण्यात आली. त्या कमीटीने पुजा यशस्वीरित्या पार पाडण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली व ती लिलया पार पाडली. या साठी त्यांना माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षा किर्ती लढ्ढा, सचिव नम्रता जाजू, व वसतिगृहाच्या रेक्टर जोती शेंडे यांचे मार्गदर्शन लाभले. तर ही पुजा यशस्वीपणे पार पाडण्यात विद्यार्थिनी कमीटी अध्यक्षा पुजा लढ्ढा, सांस्कृतिक सचिव नम्रता मुंदडा, नेहा रांदड, गायञी जाजू, रूची भन्साळी यांनी विशेष परिश्रम घेतले. एकप्रकारे शिक्षनासाठी वा कामानिमित्त घरापासून दूर असलेल्या मुलींनी आपली संस्कृती जपण्याच्या केलेल्या प्रयत्नांचा हा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल.

Leave a Reply