मुळशी पॅटर्न’ च्या ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘  ने ओलांडला २५ मिलियन व्हुजचा टप्पा   - Punekar News

मुळशी पॅटर्न’ च्या ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘  ने ओलांडला २५ मिलियन व्हुजचा टप्पा  

Support Our Journalism

Contribute Now

15 May 2019 : प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित, अभिनित आणि अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी व पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. निर्मितमुळशी पॅटर्न या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यातही सन्मानित करण्यात आले. या चित्रपटातील अबालवृद्धांनी डोक्यावर घेतलेल्या अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ या गाण्याने आपली घौडदौड कायम राखत नुकताच २५ मिलियन व्हूजचा टप्पा पार केला. तसेच काही दिवसापूर्वी झी टॉकीजवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलीव्हिज प्रीमियर झाला त्यातही मुळशी पॅटर्न ने टीआरपीचा उच्चांक गाठला आहे.

आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या भाईटम सॉंगची खासियत म्हणजे यात शहरातील सगळ्यात मोठ्या भाईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशीच्या जल्लोषावर आधारलेले हे गाणे आहे, त्यामुळे या गाण्यास खास भाई स्टाईल डान्स बघायला मिळतो. प्रविण विठ्ठल तरडे हे या गाण्यापूर्वी लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित होते, पण या भाईटम सॉंगच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा डान्स संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाला. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे तर आदर्श शिंदे यांनी अफलातून गायले आहे. गीतकार प्रणीत कुलकर्णी यांनी अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ हे गीत लिहिले आहे. या गाण्याने सोशल मिडीया, संगीत वाहिन्या आणि विविध म्युझिक अॅप्सवर ट्रेंड करत गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला. आजही अनेक वाढदिवसाच्या पार्टीत हे गाणे हमखास लावतात तसेच विविध डान्स स्पर्धामध्ये लहान मुले यावर थिरकताना दिसतात.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.
error: Content is protected !!