शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना – भारतीय जनता पक्ष-  रिपब्लिकन जनशक्ती महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना रिपब्लिकन जनशक्तीचा जाहीर पाठिंबा

३१ मार्च २०१९ : शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन जनशक्ती महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना रिपब्लिकन जनशक्तीचे पक्ष अध्यक्ष अर्जुन डांगळे यांच्या आदेशानुसार जाहीर पाठिंबा दिला . कोंढवा खुर्द येथे वेलकम हॉलमध्ये शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन जनशक्ती महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना रिपब्लिकन जनशक्तीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले .

यावेळी रिपब्लिकन जनशक्ती पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस ताहिर मुल्ला , प्रदेश उपाध्यक्ष सुदाम चाबुकस्वार , प्रवक्ते अशोक माने ,महाराष्ट्र प्रदेश सचिव हाजी तन्वीर आत्तार , महिला आघाडी पुणे शहर अध्यक्षा झुलेखा खान , महिला आघाडी सरचिटणीस संगीता सरोदे , पुणे जिल्हा युवक अध्यक्ष किसन भोसले , विद्यार्थी आघाडीचे सिध्दार्थ मोरे , पुणे शहर उपाध्यक्ष आशुतोष भोसले , पूर्व हवेली अध्यक्ष सुरेश कांबळे , पुणे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी कुराडे , मना सय्यद , अंजली पिल्ले , राजू पवार , रोशन शेख , अब्बास सय्यद आदी प्रमुख पदाधिकारी व कार्य्रकर्ते उपस्थित होते .

रिपब्लिकन जनशक्ती सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मनापासून एकदिलाने शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन जनशक्ती महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारात सहभागी होऊन अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणणार , शिवसेनेबरोबरची युती अधिक घट्ट करणार . रिपब्लिकन जनशक्ती हा पक्ष मा. अर्जुन डांगळे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष असून ,सन २०१४ च्या विधानसभे पासून शिवसेनेचा मित्र पक्ष आहे. व आत्ता या लोकसभा निवडणुकीत सुद्धा शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणून सोबत राहणार आहे , असे रिपब्लिकन जनशक्तीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी सांगितले .