ससूनच्या महिला डॉक्टर वरील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘डॉक्टर सेल ‘ कडून भाजप नगरसेविका आरती कोंढरे यांचा निषेध

पुणे :
ससूनच्या महिला डॉक्टरला  मारहाण  केल्याच्या प्रकरणी  राष्ट्रवादी काँग्रेस च्या ‘डॉक्टर सेल ‘ कडून भाजप नगरसेविका आरती कोंढरे यांचा निषेध करण्यात आला आहे .  राष्ट्रवादी काँग्रेस च्या ‘डॉक्टर सेल ‘चे अध्यक्ष डॉ . सुनील जगताप यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हा निषेध करण्यात आला आहे .
‘नगरसेवक असलेल्या जबाबदार महिलेने महिला डॉक्टरला मारहाण करणे ही समाजाच्या दृष्टीने घृणास्पद गोष्ट आहे . डॉक्टर संरक्षण कायद्यान्वये कोंढरे यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे . तरच रुग्णसेवा करणारे वैद्यकीय व्यावसायिक हे भीतीच्या दडपणाखाली राहणार नाहीत ‘ ,असे या पत्रकात डॉ जगताप यांनी म्हटले आहे .
कोंढरे यांच्यावर तातडीने कारवाई करावी ,असे आवाहन पुणे पोलीस आयुक्तांना करण्यात आले असून ,कारवाई न झाल्यास
राष्ट्रवादी काँग्रेस च्या ‘डॉक्टर सेल ‘ कडून  आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .  डॉक्टर सेलचे कार्याध्यक्ष डॉ  राजेश पवार ,उपाध्यक्ष डॉ अजित पाटील ,डॉ  सिद्धार्थ जाधव ,सचिव डॉ हेमंत तुसे ,डॉ राहुल सूर्यवंशी ,डॉ दत्तात्रय गायकवाड ,डॉ लालासाहेब गायकवाड ,डॉ शंतनू जगदाळे ,डॉ प्रदीप उरसळ ,डॉ  प्रताप ठुबे ,डॉ  सुनीता काळे ,डॉ  सुलक्षणा जगताप ,डॉ  सुजाता वर्गळे ,डॉ  राजेंद्र जगताप ,डॉ  विजय वाळद ,डॉ  सुहास लोंढे ,डॉ  अर्जुन चव्हाण ,डॉ परशुराम सूर्यवंशी ,डॉ  मुस्तफा तांबोळी ,डॉ नितीन पाटील यांनीही या घटनेचा निषेध केला आहे