सिग्मा इव्हेंट्सच्या समाजामधील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान

३० मार्च २०१९ : सिग्मा इव्हेंट्सच्या समाजामधील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला . वानवडीमधील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या महिला सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द निर्माता व दिग्दर्शक योगेश वनवे , तकवा ज्वेलर्सचे संचालक मुफजर शेख , सिग्मा इव्हेंट्स संचालक ब्रायन स्वामी , बेइंग मी या ब्युटी सलूनच्या संचालिका अश्विनी बोधी , जेष्ठ सामाजिक कार्य्रकर्ते सुदामराव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते .

समाजामधील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांमध्ये कायदा क्षेत्रामधील ऍड. शामला बेनजी , सामाजिक क्षेत्रामधील प्रा. मंजुषा मकासरे , संगीत क्षेत्रामधील पूजा , शैक्षणिक क्षेत्रामधील संगीता खेर , रेडिओ जॉकी क्षेत्रामधील स्मिता त्रिभुवन , पोलीस क्षेत्रामधील नीलिमा गायकवाड , क्रीडा क्षेत्रामधील संध्या पानबुडे , सामाजिक क्षेत्रामधील समिधा शेख , नृत्य क्षेत्रामधील मेघना केसकर , शरीरसौष्ठव क्षेत्रामधील स्टेला गाडे , , वैद्यकीय क्षेत्रामधील डॉ प्रीती सरदार ,बालमानस शास्त्र क्षेत्रामधील डॉ दीपालक्ष्मी पेशवे , स्त्री रोग तज्ञ क्षेत्रामधील डॉ. मलिका गायकवाड , स्केट डान्स क्षेत्रामधील मिशेल भस्मे सामाजिक क्षेत्रामधील शबाना शेख , सुपर अँकर क्षेत्रामधील अफसाना शेख आदीचा सन्मानचिन्ह , शाल व श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमाचे आयोजन सिग्मा इव्हेंट्स संचालक ब्रायन स्वामी व मार्कस भस्मे यांनी केले होते .