सोना नदीच्या जलसाठ्याचे पूजन

औरंगाबाद, दि.12— सोयगावातील  सोना नदीचे बंधारा नूतनीकरण, खोलीकरण व रुंदीकरण  करण्यात आले आहे. त्यामुळे सोना नदीच्या पात्रात अकराशे सहस्त्र घनमीटर  पाणीसाठा आडविण्यात आला आहे. या जलाशयाचे पूजन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट,जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, रावसाहेब दानवे यांच्या  उपस्थितीत पार पडले .

सोयगावातील सोना  नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणामुळे नदीच्या दोन्ही बाजूंच्या शेतीला मोठ्याप्रमाणात फायदा झाला असून शेतकऱ्यांच्या विहिरींची  पाणी पातळी वाढली आहे. या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेती उत्पादन घेण्यास होत असून उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

या जलपूजन  कार्यक्रमास एकनाथ जाधव,  सोयगाव नगराध्यक्ष  कैलाश काळे, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे अधीक्षक अभियंता  व्ही.बी. नाथ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.  सूर्यवंशी , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  एस.जी. पडवळ, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. काळे, कार्यकारी अभियंता श्रीमती गाडेकर, सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोटे, जयप्रकाश चव्हाण, सयाजी वाघ   यांची उपस्थिती होती.  नदीचे खोलीकरण, रुंदीकरणाचे काम रिलायन्स फाऊंडेशन या संस्थेमार्फत पूर्ण करण्यात आले आहे. या कार्यक्रमास फाऊंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.