स्मिंकने वर्ल्ड्स प्लेसेस लाइव्ह नाऊ नावाचे  जगातील पहिले अनोखे रियल टाइम अपडेट देणारे अॅप लाँच केले


  

पुणे, एप्रिल १९, २०१८: डॉक्टर्स आणि क्लिनिक्सची यशस्वी जोडणी करून त्यात यश संपादन केल्यावर पुण्यातील स्टार्टअप स्मिंकने आज आपल्या वर्ल्ड्स प्लेसेस लाइव्ह नाऊ नावाचे जागतिक उपभोक्ता अॅप लाँच केले. पूर्वी आपल्याला स्मिंकच्या अॅपवर फक्त क्लिनिक्स मधील रांगाबद्दलची लाइव्ह माहिती मिळत होती पण आता या अॅपमुळे जगातील कुठल्याही ठिकाणाविषयीची लाइव्ह माहिती आता वापरकर्त्यांना मिळणार आहे. (डॉक्टर्स आणि क्लिनिक्स ची माहिती पुरवण्यात आघाडीवर असलेल्या स्मिंकच्या अॅपवर भारतातील प्रमुख शहरांतील १५० हून अधिक प्रीमियमक्लीनिक्सचा समावेश आहे), पण नवीन अॅप यूजर्सना आता जगातीलकोणत्याही ठिकाणा विषयीची लाईव्ह माहिती पोस्ट करण्यासाठी समर्थितकरणार आहे.

स्मिंक हे समुदायाने वापरायचे एक उत्तम व्यासपीठ असून त्यावर जगातील कुठल्याही ठिकाणाविषयीची लाइव्ह माहिती प्रक्षेपित होणार आहे. क्लब मध्ये कोणते गाणे वाजवले जात आहे, या संध्याकाळी शेफने काय स्पेशल बनवले आहे, जवळचे म्युसीयमला किती गर्दी आहे अश्या अनेक प्रश्नांची माहिती या अॅपद्वारे मिळणार आहे. फोटो, केवळ टेक्स्ट मेसेज किंवा १५ सेकंदांचा छोटा व्हिडीओ या ३ प्रकारापैकी कोणत्याही एका प्रकारात तुम्ही या अॅप वर आपली माहिती प्रक्षेपित करू शकता. या अॅपवर कोणताही चुकीचा किंवा खोटा कंटेंट अपलोड होणार नाही याची स्मिंकने पूर्णपणे काळजी घेतली आहे. प्रत्येक पोस्ट लोकेशन बघून व्हेरिफाय केली जाते आणि त्याप्रकारेव्हेरीफाईड पोस्ट म्हणून मार्क केली जाते. यूजर्स लोकेशन व्हेरिफाय करतादेखील पोस्ट करू शकतात पण त्या पोस्टला व्हेरिफाय असा मार्क मिळतनाही. भविष्यातदेखील आणखी सुधारणा करून अचूक माहिती प्रक्षेपित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. हे अॅप वापरणारा समुदाय एखादी पोस्टडाउन वोट करून फेक किंवा असंबद्ध मार्क करू शकतात. पोस्ट केल्यानंतरच्या २४ तासात कंटेंट या अॅप वरून निघून जात असल्यामुळे फीडही नेहमीच अपटुडेट राहते.

स्मिंकचे हे नवीन अॅप युसर्सने समर्थित केले असून यावरील सर्व माहिती हि हे अॅप वापरणार्यांनी यावर प्रक्षेपित केली आहे. कंपनीने सुरवातीला या अॅप बद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि विविध शहरे हि या अॅपच्या माध्यमातून जगभरात पोचावीत यासाठी लोकल चाम्पियन हि प्रतियोगिता सुरु केली असून सुरवातीला या अॅपवर पोस्ट करणार्यांना लोकल चाम्पियन बनण्याची संधी आहे.

सुरवातीच्या काळात या अॅपद्वारे पुणे आणि बंगळूर या दोन शहरांवर लक्ष केंद्रित केले जाणार असलेतरी हे अॅप जागतिक दर्जाचे अॅप असून विविध भाषा आणि देशातून यावर युसर्स कोठूनही आपला कंटेंट प्रक्षेपित करू शकतात.

याप्रसंगी बोलताना श्री सचिन भारद्वाज, सीईओ आणि सह- संस्थापकस्मिंक म्हणाले, “आजच्या काळात आपल्याला इंटरनेट स्थिर स्वरूपातील माहिती उपलब्ध करून देते ज्यामध्ये रिव्हुव, रेटिंग, पत्ते किंवा फोन नंबर्स यांचा समावेश आहे पण आपण बर्याचदा भावनावश होऊन कोठेतरी जाण्याचा अचानक निर्णय घेतो पण आपल्याला जिथे जायचे आहे त्या ठिकाणी आत्ता काय होत आहे हि माहिती इंटरनेटवर उपलब्ध नसते. आज रात्री कुठल्या पब मध्ये जास्ती रंगतदार पार्टी आहे, आजचे भाजी मार्केटचे दर काय आहेत, माझ्या जिम मध्ये किंवा सोसायटीच्या स्विमिंग पूल मध्ये किती गर्दी आहे अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला स्मिंक वर मिळतील.स्मिंकद्वारे आम्हाला युसर्सना रियल टाइम माहिती प्रक्षेपित करण्यास सांगायचे आहे ज्याचा फायदा त्याठिकाणी जाण्याची तयारी करणाऱ्या त्यांच्या मित्रांना आणि इतर वापरकर्त्यांना होईल.”

टेस्टीखाना.कॉम या आपल्या पहिल्या यशस्वी कंपनीनंतर सचिन भारद्वाज,संतोष नागराजन आणि शेल्डन डिसुझा यांनी २०१५ ला स्मिंकची सुरुवात केली. जगभरातील ठिकाणांची माहिती आणि रियल टाइम अपडेट मिळवणारे एक व्यासपीठ तयार करणे हा स्मिंकचा मुख्य हेतू आहे. या अॅपवर सतत होणारी ट्रोलिंग, शिवीगाळ किंवा चुकीची भाषा आणि डेटाचा अतिरिक्त वापर या मुख्य गोष्टींचा बंदोबस्त केला गेला आहे ज्यामुळे युसर्सचे पूर्णपणे संरक्षण होणार आहे. युसर्सनि पोस्ट केलेली सगळी माहिती २४ तासात या अॅपवरून पुसली जाईल आणि ट्रोल होण्याच्या भीती पासून युसर्सची सुटका होईल तसेच अॅपवर पोस्ट होणारा डेटा फोनवर कधीही सेव होणार नाही आणि तुमच्या फोनची जागा वाया जाणार नाही.

स्मिंकला काय अनोखे बनवते

  • विविध ठिकाणांविषयी रियल टाइम अपडेट

बाहेर पडण्याआधी स्मिंक करा आणि परस्ठीतीचा आढावा घ्या

  • आज आहे तर उद्या नाही

प्रक्षेपीत केलेली माहिती २४ तासात पुसली जाते ट्रोलिंगचा धोका नाही

  • ग्रुप म्युट करण्याची गरज नाही

जेव्हा गरज असते तेव्हाच आणि तेही तुम्ही सुरु केल्यावरच माहिती मिळते

  • फॉलोवरचे प्रेशर नाही

इतर अॅपस प्रमाणे फॉलोवरचे वाढवण्याचे प्रेशर नाही स्मिंकवर केवळ रियल टाइम माहिती मिळते

  • अपमानास्पद किंवा वाईट भाषेला थारा नाही

या व्यासपीठावर शिवीगाळ किंवा चुकीच्या भाषेला थारा नाही

अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करा :

https://play.google.com/store/apps/details?id=com.SMINQ.places