‘स्मृतिगान ‘ मधून स्वरराज छोटा गंधर्व यांच्या आठवणींना उजाळा !

पुणे : 
 
रंगभूमीच्या सुवर्णकाळातील छोटा गंधर्व यांच्या आठवणी आणि एकाहून एक सरस नाट्यपदांची बरसात झाली   आणि पुणेकर रसिक त्यात हरवून गेले  !
निमित्त होते ‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘ आयोजित  ‘ छोटा गंधर्व स्मृतिगान ‘ या कार्यक्रमाचे !
 
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  छोटा गंधर्व यांच्या आठवणी ,नाट्यपदे यांचे  स्मरणरंजन  सादर करणाऱ्या  ‘ छोटा गंधर्व स्मृतिगान ‘ या कार्यक्रमाला  शुक्रवार, दिनांक १५ मार्च  रोजी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला .
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा ७१ वा कार्यक्रम होता .संगीत रंगभूमीवर आपल्या मधुर गळ्याने ,अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या छोटा गंधर्व यांची नाट्यपदे या कार्यक्रमात सादर केली गेली  . 
 
 शंकर कुलकर्णी  प्रस्तुत  हा  कार्यक्रम  ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रस्ता  येथे झाला . ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले . शंकर कुलकर्णी यांनी निवेदन केले .
मुकुंदराज गोडबोले ,चिन्मय जोगळेकर ,सुचेता अवचट यांनी  गायन केले  . तबल्यावर विद्यानंद देशपांडे तर सिंथेसायझरवर अमित ओक,संवादिनीवर  जयराम पोतदार यांनी साथसंगत केली  .
प्रथम ‘संशय कल्लोळ ‘नाटकातील नांदी ने सुरुवात झाली . छोटा गंधर्व  यांचे चाहते आणि  शिष्य मुकुंदराज गोडबोले  यांनी ‘मृच्छकटिक’ मधील ‘जलधर संगे नभ भरले ते ‘, ‘सौभद्र’ मधील ‘प्रिये पहा रात्रीचा  समय सरूनी’,’ नभ मेघांनी आक्रमिले ‘,या रचना सादर केल्या .
सुचेता अवचट यांनी ‘सुभद्रा’ मधील ‘तपो बलाने थोर  जिंकीन चंचल तो चितचोर युद्ध करीन घनघोर ‘,’विद्याहरण’ नाटकातील ‘ मधुकर वन वन ‘ ही पदं सादर केली.  चिन्मय जोगळेकर  यांनी ‘शूरा मी वंदिले’, ‘सौदर्याचा भर ज्वानीचा ‘,’रागिणी  मुख चंद्रमा ‘ ही पदं गायली