स्वच्छ भारत अभियानाच्या प्रचारार्थ पुण्याचा संतोष राजेशिर्के रिव्हर्स गेयर मध्ये स्विफ्ट गाडी चालवत करणार १७५४९ किलोमीटर ची भारत परिक्रमा

भोर ते सिंदखेडराजा – महाराष्ट्रातील यात्रा सामाजिक सौहार्दासाठी .क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संदीप खर्डेकर यांची माहिती

पुण्यातील मराठा समाजातील तरुण संतोष राजेशिर्के ह्याला वेगळेपणाचा ध्यासाने झपाटले आणि त्या जिद्दीनेच त्याने मराठा क्रांती मोर्चा च्या वेळी पुणे ते मुंबई रिव्हर्स गेयर मध्ये सुरक्षितरित्या चारचाकी चालविण्याचा विक्रम केला.या आधी पुणे ते किल्ले रायगड असा ही प्रवास रिव्हर्स गेयर मध्ये करणारा संतोष सध्या मात्र अस्वस्थ आहे ते महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडल्यामुळे.छत्रपती शिवाजी महाराज,फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात शांतता नांदावी आणि सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकोप्याने राहावे या उद्देश्याने संतोष येत्या १० तारखेला भोर येथील शिंद गवडी ह्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या जन्म गावापासून त्यांना अभिवादन करून निघणार असून दि १२ जानेवारी रोजी जिजाऊ मासाहेबांच्या जयंती दिनी सिंदखेडराजा येथे पोहोचणार आहे.अशी पहिल्या टप्प्यातील रिव्हर्स गेयर मध्ये स्विफ्ट गाडी चालविण्याचा आगळा वेगळा उपक्रम करणार असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.संतोष राजेशिर्के याने गत वर्षी मराठा क्रांती मोर्च्यात सहभाग घेताना पुणे ते मुंबई रिव्हर्स गेयर मध्ये चारचाकी चालवत नेल्याबद्दल कोथरूड नवरात्र महोत्सवात आमदार लक्ष्मण जगताप.भाजप चे शहर अध्यक्ष योगेश गोगावले व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते त्याचा कोथरूड भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता.यानंतर संतोष च्या ह्या अप्रकाशित आणि आगळ्या वेगळ्या छंदाला प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो असे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
आता संतोष जिद्दीने सिंदखेडराजा पर्यंतची यात्रा पूर्ण करणार असून त्यानंतर तो स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी १७००० कि मी ची भारत परिक्रमा करणार आहे.