राष्ट्रीय एकता सेवा संघाच्यावतीने हज यात्रेकरूचे  अनुदान मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी उपयोगात आणून हज यात्रेचा कोटा वाढविल्याबद्दल सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे कुरेशी समाजबांधवांच्यावतीने जाहीर सत्कार सोहळा संपन्न

Share this News:

राष्ट्रीय एकता सेवा संघाच्यावतीने हज यात्रेकरूचे अनुदान मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी उपयोगात आणून हज यात्रेचा कोटा वाढविल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा पुणे लष्कर भागातील कुरेशी समाजबांधवांच्यावतीने स्मृतीचिन्ह, शाल , पुष्पगुछ देउन भव्य जाहीर सत्कार सोहळा संपन्न झाला . पुणे लष्कर भागातील कुरेशीनगरमध्ये झालेल्या जाहीर सत्कार सोहळ्यास कुरेशी समाजाचे अध्यक्ष हाजी शकील कुरेशी ,राष्ट्रीय एकता सेवा संघाचे अध्यक्ष झाकीर कुरेशी , भाजप पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष जयप्रकाश पुरोहित , हारून रशीद कुरेशी , गफूर कुरेशी , ख्वाजा कुरेशी,अमजद कुरेशी , कादर सौदागर , इकतेदार कुरेशी ,अब्बास कुरेशी , जाफर कुरेशी ,सरफराज कुरेशी , रशीद कुरेशी ,बिलाल हाजी कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले कि , हज यात्रेकरूंचे साडेसातशे कोटी रुपये हे मुस्लिम समाजामधील महिलाच्या उन्नतीसाठी व मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे . महाराष्ट्र सरकारने हजसाठी दोन हजार कोटा वाढविला असून कुरेशी समाजाचे समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . कुरेशी समाजाच्या सर्व समस्या सोडविणार असल्याचे सांगितले .

यावेळी राष्ट्रीय एकता सेवा संघाचे अध्यक्ष झाकीर कुरेशी यांनी सांगितले कि , भाजप सरकार मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेत आहे , त्यामुळे मुस्लिम समाजाचा विकास होत आहे . कुरेशी समाजाचे पारंपरिक व्यवसायासाठी कायदेशीर पाऊले उचलावीत , समाजाला व्यवसाय करण्यासाठी होणारा त्रास कमी करावा , कुरेशी समाजाच्या युवकांच्या प्रगतीसाठी आर्थिक विकास महामंडळ सुरु करण्याची मागणी करण्यात आली .

या कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत राष्ट्रीय एकता सेवा संघाचे अध्यक्ष झाकीर कुरेशी यांनी केले तर सूत्रसंचालन अब्बास कुरेशी यांनी केले तर आभार ख्वाजा कुरेशी यांनी मानले .