नद्यांच्या शुद्धीकरणाच्या कार्यक्रमावर विशेष भर देण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले

Share this News:

       परभणी,दि.07ः- नद्या ही उर्जेची ठिकाणे आणि श्रद्धास्थाने असून, नद्यांची पात्रे दूषीत होऊ नये यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून राज्यातील नद्यांच्या शुद्धीकरणाच्या कार्यक्रमावर विशेष भर देण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

       देवगाव फाटा येथील सिद्धनाथ महादेव व गणपती मंदिर येथे महाव्दाराच्या कामाचे भूमीपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री बोरगावकर, तहसीलदार आसाराम छडीदार, मठाधिपती सिद्धनाथ बाबा, विठ्ठल महाराज बोकन, गणेशराव बोराडे, भाऊसाहेब कदम, बाबुराव शहाणे, गणेशराव शहाणे, राजाभाऊ बोराडे, नगरसेवक संजय गायकवाड, गुलाबराव लाटे, श्री राजुरकर तसेच संबंधित विभाग व यंत्रणाचे अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, औंढा नागनाथसह राज्यातील जोतिर्लिंग तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात  असून चार जोतिर्लिंग तीर्थक्षेत्राचा विकास आराखडाही तयार करण्यात येत आहे. मराठवाडय़ात लवकरच वाॅटरग्रीड तयार करण्यात येणार असून याव्दारे ग्रामीण भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. शाश्वत सिंचन आणि टंचाईमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची परिणामकारकता आता दिसून येऊ लागली आहे.

नद्यांची पात्रे दूषित होऊ नये यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, नमामि चंद्रभागा अंतर्गत चंद्रभागा नदीच्या शुद्धीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विविध विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांच्या माध्यमातून शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबारपणे उभे आहे. वाटूरपासून परभणीकडे जाणा-या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठीही भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी सांगितले.

कृषिपंपांना दिवसा बारा तास वीजपुरवठ्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आल्याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक विठ्ठल महाराज बोकन यांनी केले.