भाजपने नेहरुनगरमध्ये जाळला ओवेसींचा पुतळा

Share this News:

पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या नेहरुनगर-निगडी-चिखली मंडलाच्या वतीने ‘भारत माता की जय’ असे म्हणणार नाही, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा प्रतिकात्मक पुतळा आज (गुरुवारी) नेहरुनगर येथे जाळण्यात आला.

ओवेसींनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत गळ्यावर सुरा ठेवला तरी मी कदापि ‘भारत माता की जय’ असे म्हणणार नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावरुन वादंग उठले असतानाच एमआयएमचे मुंबईतील आमदार वारिस पठाण यांनीही काल विधानसभेत ओवेसींची ‘री’ ओढली. त्यामुळे एमआयएम विरोधात संतापाची लाट उसळली असताना भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन छेडले आहे.

नेहरुनगर येथील नेहरु चौकात सकाळी हे आंदोलन झाले. असदुद्दीन ओवेसी यांचा पुतळा जाळत निदर्शने करण्यात आली. “वारिस पठाण हा लावारिस आहे, त्याला पाकिस्तानमध्ये हाकला” अशा शब्दात संताप व्यक्त करण्यात आला. “इस देश में रहेना होगा, भारत माता की जय कहेना होगा”, “चले जाव, चले जाव, पाकिस्तान चले जाव” अश्या घोषणा देण्यात आल्या. “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्‌”चा जयघोष यावेळी करण्यात आला.

नेहरुनगर-निगडी-चिखली मंडल अध्यक्ष अजय पाताडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, नगरसेविका सिमा सावळे, भाजप नेते सारंग कामतेकर, अक्षता पाताडे, सारिका पवार, गायत्री सावंत, मानसी सावंत, रुपाली अहीरे, हेमलता मोळक, रवींद्र नलावडे, रामकृष्ण राणे, किशोर हातागळे, संजय भालेकर, अनंत कवितकर, दत्तात्रय यादव, सतिश खेडेकर, सचिन देवकुळे, दिनेश साळवी, सचिन सावंत, सुरेंद्र घाणेकर, प्रशांत जाधव, प्रकाश धोंडे, अतुल हिंगे, किशोर ब्राह्मणकर, विकास मिश्रा आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.