कोथरूड येथे अवैध ताडी विक्री केंद्राला भाजपाचा विरोध

Share this News:

भाजपा प्रभाग २७, किश्किंधानगर, पौड रस्ता, कोथरूड येथे अवैध ताडी विक्री केंद्राला भाजपाचा विरोध

Pune : तीनच दिवसापूर्वी वरील ठिकाणी अवैध ताडी विक्री केंद्र सुरू झाले आहे. भाजपा प्रभाग २७ च्या कार्यकर्त्यांनी आज डॉ. संदीप बुटाला यांच्या बरोबर सदर ठिकाणी जाऊन ह्या अवैध केंद्राला विरोध दर्शवला. तसेच अवैध दारू साठ्याचे फोटो काढून कोथरूड पोलिस ठाण्या ह्या विरोधात तक्रार पोलिस निरीक्षक श्री. नितीन भोसले यांच्याकडे दिली. तसेच राज्य एक्साईज चे एस.पी. श्री. वर्दे यांच्याशी दूरद्धनीद्वारे तक्रार केली. गेल्या काही दिवसात ह्या भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. गाड्यी जाळणे व ईतर मालमत्ताचे नुकसान करणे, असे प्रकार वाढले आहेत. अशात वरील प्रकारे अवैध दारू विक्री सूरू राहीली तर गुन्हेगारीही वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याची जाणीव वरील दोन्ही अधिका-यांना करून दिली.
दोघांनीही योग्य कारवाई करू असे सांगितले आहे.

यावेळी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सोशल मिडिया सेल महाराष्ट्र प्रदेश चे आर्किटेक्ट मंदार घाटे, वकील आघाडीचे अॅड. नवनाथ लाड, संतोष अमराळे, भाग्येश ढवळे, सुयश ढवळे, गणेश दहिभाते, व इतर प्रभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.