खा.सुप्रियाताई  सुळे यांचा मराठवाडा दौरा

Nationalist Congress Party (NCP) leader Supriya Sule interact with student of Haroon Mukati Islamic Centre in Aurangabad, India on April 21, 2016. Supriya Sule on her two-day visit to drought-affected districts of Beed, Latur and Osmanabad, conducted irrigation-related relief projects under the Yashwantrao Chavan Pratishthan, Rashtrawadi Welfare Trust, and Yashaswini Samajik Sansthan. The entire Marathwada region has received virtually no rain for the past two years. (Manoj Patil/SOLARIS IMAGES)

Share this News:

खासदार सौ सुप्रियाताई सुळे या मराठवाडा येथे दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट, यशस्विनी सामाजिक अभियान या संस्थांच्या वतीने लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळावा याकरिता अनेक उपक्रम सुरु करण्यात आले आहे. या उपक्रमांना भेट देऊन शेतकरीवर्गासोबत संवाद साधण्यासाठी हा दौरा आहे. आज त्यांनी औरंगाबाद येथे हारून मुकाती इस्लामिक सेंटरच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या रोटी आणि कपडा बँक येथे भेट दिली.

तिथल्या युवतींशी संवाद साधला. त्यानंतर पाचोड, पैठण येथे चित्ते नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे त्याठिकाणी भेट दिली. गावात उभारण्यात आलेल्या सिमेंट नाल बंधाऱ्याचे उद्घाटनही त्यांनी केले. संपूर्ण कर्जमाफी, पिण्यासाठी पाणी, संपूर्ण शिक्षणशुल्क माफी, वीजबिलमाफी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सदैव आग्रही असून सरकारकडे वारंवार विनंत्या करूनही या प्रश्नांकडे गंभीरपणे दखल घेतली जात नाही असे त्या यावेळी म्हणाल्या. गेवराई तालुक्यात आमदार अमरसिंह पंडीत यांनी ‘जलशारदा’हा प्रकल्प सुरु केला आहे.

लोकसहभागातून सुरू असलेल्या जलसंधारणच्या कामाची पाहणी केली,शेतकरी आणि महीलांशी संवाद साधला. आगामी काळात पाऊस झाल्यास नक्कीच लाभदायक ठरेल. बीड तालुक्यातल्या खापर पांगरी येथील कुमशी चारा छावणी येथे देखील खा.सुप्रियाताई सुळे यांनी भेट दिली. या दौऱ्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ , युवक अध्यक्ष निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष नीलेश राऊत आदी सहभागी आहेत.