Tuesday, 14/8/2018 | 2:47 IST+5
Punekar News

शिवशाहीर पुरंदरे यांच्या घरातील मीटर बॉक्सला किरकोळ आग जुनाट वायरिंगमधील शॉटसर्किटमुळे घडला प्रकार

पुणे, दि. 17 : शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरामधील वीजमीटर जवळील जुनाट वायरिंगमध्ये शार्टसर्कीट होऊन वीजमीटर व वायरिंगला किरकोळ आग लागली होती. महावितरणच्या कर्मटचाऱ्यांनी तात्काळ घरी जाऊन पुढील धोका टाळला. ही घटना गुरुवारी (दि. 17) पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी, की शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या पर्वती येथील वाड्यामधील वायरिंगमध्ये ठिणग्या उडून किरकोळ आग लागली व त्यात जुन्या वायर्स व वीजमीटर जळाले. मात्र एमसीबी ट्रीप झाल्यामुळे घरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणला याबाबत माहिती मिळताच कर्मचार्‍यांनी तात्काळ शिवशाहीर श्री. पुरंदरे यांच्या घरी जाऊन पुढील धोके टाळण्यासाठी पाहणी व उपाययोजना केल्या. यामध्ये वीजमीटर ते वाडाअंतर्गत असलेल्या सुमारे 30 वर्षांपूर्वीच्या वायरिंगचे इन्सूलेशन खराब झाल्याचे निदर्शनास आले. एखादी पाल किंवा उंदरामुळे इन्सूलेशन खराब झालेल्या ठिकाणच्या वायरिंगध्ये हे शॉर्टसर्किट झाल्याचे दिसून आले.

पर्वती विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सायस दराडे यांनीही शिवशाहीर श्री. पुरंदरे यांच्या घरी जाऊन वीजमीटर व वायरिंगची पाहणी केली. यावेळी जुनी तसेच इन्सूलेशन खराब झालेली वायरिंग बदलून घेण्याची विनंती महावितरणकडून करण्यात आली. दरम्यान शिवशाहीर श्री. पुरंदरे यांच्या घरी नवीन वीजमीटर बसविण्यात आले असून वीजपुरवठाही पूर्ववत करण्यात आला. तसेच या घटनेबाबत विद्युत निरीक्षक विभागाला महावितरणकडून कळविण्यात आले आहे.

Share With US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137

Advertise with US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137