Sunday, 24/6/2018 | 6:54 IST+5
Punekar News

राष्ट्रवादीकडून आयुक्तांना जलपर्णी भेट

राष्ट्रवादीकडून आयुक्तांना जलपर्णी भेट

पिंपरी (दि. 14 जून 2018) पिंपरी चिंचवड शहरातून वाहणा-या इंद्रायणी, पवना आणि मुळा नदी पात्रातील वाढलेल्या जलपर्णीमुळे पिंपरी, चिंचवड, फुगेवाडी, दापोडी, कासारवाडी, च-होली, डुडूळगाव, मोशी, चिखली, ताथवडे, देहू गावातील नदीपरीसरात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या भागातील जलपर्णी काढण्याकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हार्डीकर यांना प्रतिकात्मक जलपर्णीचा गुच्छ भेट देण्यात आला.

गुरुवारी (दि. 14 जून) आयुक्त कार्यालयात आयुक्तांना विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, माई काटे, प्रज्ञा खानोलकर, राजू बनसोडे, शाम लांडे, राष्ट्रवादी युवक पदाधिकारी लाला चिंचवडे, प्रा. मनोज वाखारे आदी उपस्थित होते.

या भागात वाढलेल्या जलपर्णीमुळे डासांचा पादुर्भाव वाढला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी 22 जूनला फुगेवाडीत पवना घाटावर मानवी साखळी करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यानंतर विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग, मलनिस्सारण, पाणी पुरवठा, पर्यावरण विभाग व महाराष्ट्र राज्य प्रदुषण महामंडळाचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत 10 जून पर्यत जलपर्णी काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतू अध्यापही सर्व नदीपात्रातील जलपर्णीची स्थिती ‘जैसे थे’ अशीच असल्याचे वाघेरे पाटील व दत्ता साने यांनी आयुक्तांच्या निर्दशनास आणून दिले. यावेळी आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी शिष्टमंडळास सांगितले की, नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने चाळीस लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदार नेमले आहेत. मे ते एप्रिल या बारामहिन्यांच्या काळासाठी ठेकेदारांना आगाऊ रक्कम देऊन काम देण्यात येते. चालू वर्षीचे काम आगामी काळात सात दिवसात जादा मनुष्यबळ वापरुन पुर्ण करु असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

Share With US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137

Advertise with US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137