Friday, 20/7/2018 | 10:16 IST+5
Punekar News

‘अँग्लू उर्दू बाईज हायस्कूलमध्ये ‘वन महोत्सव’ निमित्त वृक्षारोपण

पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्रुकेशन सोसायटी’च्या ‘अँग्लो उर्दू बाईज हायस्कूलने नुकताच ‘वन महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला. याप्रसंगी शाळेच्या परिसरात झाडे लावण्यात आली.
यावेळी प्राचार्य परवीन झेड. शेख , डॉ. गणपत मोरे (माध्यमिक,जिल्हा शिक्षण अधिकारी), हारून अत्तार ( प्राथमिक शिक्षण अधिकारी), संध्या गायकवाड (उप शिक्षण अधिकारी), धनंजय भुते (उप शिक्षण अधिकारी), हाजी कादीर कुरेशी (शाळा समिती अध्यक्ष), मजीद उस्मान दाऊद (अध्यक्ष ,जे.आर. कॉलेज) उपस्थित होते.
‘या उपक्रमामध्ये औषधी वृक्ष लावण्यात आले. विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाने मिळणारे फायदे याबाबत माहिती होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते’, अशी माहिती परवीन झेड. शेख प्राचार्य यांनी पत्रकाद्वारे दिली.

Share With US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137

Advertise with US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137