SNDT विद्यापिठामध्ये अभाविप पुणे महानगराच्या वतीने परीक्षा विभागाच्या निष्काळजी कारभराविरुद्ध तीव्र आंदोलन

25/02/2020- अखिल भरती विद्यार्थी परिषद, पुणे महानगर तर्फे श्रीमती नाथबाई दामोदर ठाकरसी (SNDT) महाविद्यालयात तीव्र आंदोलन करण्यात आले. खऱ्या अर्थाने विद्यार्थिनींना शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशाने विद्यापीठाची स्थापना करण्यात आली परंतु आज सर्व नियमांना तिलांजली देण्याचे काम सध्याच्या विद्यापिठ प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण कुलगुरू यांचे महाविद्यालय व विद्यपीठ प्रशासनावर नाही तसेच परीक्षा विभाग नियंत्रक कोणत्याही नियमांचे पालन करताना दिसत नाही.

खालील मागण्याना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात आले.

१. विद्यापिठाच्या निष्काळजी कारभारामुळे फोटोकाॅपी विद्यार्थ्यांना ३० दिवसात मिळाली पाहिजे. तरी आज १०७ दिवसापेक्षा अधिक विलंब झाला आहे.
२. निकाल लावण्यास दीर्घकाळ विलंब.
३. पुनर्मुल्याकंनासाठी पाठवलेल्या पेपर मध्ये कोणताही बदल न होता पुन्हा पुन्हा तोच निकाल लावला जात आहे .

४. प्रथम सत्राचा निकाल द्वितीय सत्राच्या परीक्षेआधी एक दिवस विद्यार्थ्यांना कळवण्यात आला. नियमानुसार ९० दिवसानंतर परीक्षा घेतली पाहिजे परंतु एक दिवस आधी सांगून परीक्षा घेतली जाते.

५ विद्यापीठाकडून ७५० रु फोटोकॉपी व पुनर्मुल्याकंन घेतले जातात ते कमी करण्यात यावे.

या सर्व समस्यांवर अभाविप वारंवार पाठपुरावा करीत होते तरी SNDT विद्यापीठ निष्काळजीपणे समाधानकारक निर्णय घेत नसल्याने आंदोलन करण्यात आले.

विद्यापीठाने परीक्षा नियंत्रक यांची तात्काळ हक्कलपटी तसेच त्वरित सर्व समस्या सोडवाव्यात व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे अन्यथा ह्यापेक्षा ही तीव्र आंदोलन अभाविप करेल असा इशारा पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला. विद्यापीठ प्रशासन लवकरात लवकर ह्या मागण्या सोडवेल असे आश्वासन विद्यापीठाने दिले व त्यानंतर आंदोलनाचा समारोप करण्यात आला.