‘अँटी करप्शन कमिटी’तर्फे पूरग्रस्तांना मदत 

Share this News:

17/8/19, पुणे : कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. या पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तूंची आवश्यकता आहे.

 

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अँटी करप्शन कमिटी, महावीर फूड बँक, एमईएस भिशी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना चादरी, साड्या कपडे, औषधे अशी मदत संकलित करण्यात आली. संकलित केलेली ही सर्व मदत भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तृप्ती देसाई यांच्या माध्यमातून ही मदत चंदगड, गडहिंग्लज, शिरोळ, हेब्बाळ, आरळगुंडी आदी पूरग्रस्त गावांना पोहोचविण्यात येणार आहे.

 

यावेळी अँटी करप्शन कमिटीचे पुणे शहर अध्यक्ष सूर्यकांत फाळके, दक्षता अधिकारी अविनाश चिवटे, महावीर फूड बँकेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा,  उपाध्यक्ष शांतीलाल देसर्डा, ऍड. ईश्वर बोरा, विजय चोरडिया, प्रमोद छाजेड, सतीश सुराणा, अनंत फाळके, नयन मक्तेदार उपस्थित होते. एक हजार वह्या-पेन आणि इतर शालेय साहित्य संस्थेच्या वतीने गरजू मुलांना पाठविण्यात येणार असल्याचे विजयकुमार मर्लेचा यांनी सांगितले.