विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षाचालकांचे आंदोलन

पुणे, सप्टेंबर ९, २०१९  : हडपसर येथील सहा सीटर रिक्षांवर कारवाई करावी, पिंपरी चिंचवड येथील झालेल्या बोगस परमिट घोटाळ्यांची चौकशी करून संबंधित आर.टी.ओ अधिकारी यांच्याविरोधात कारवाई करावी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने आरटीओ अधिकारी यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी

मुक्त रिक्षा परवाना बंद करावा,  बेकायदेशीर वाहतुकी विरोधात कारवाई करावी, A U  फायनान्स कंपनीच्या वतीने बेकायदेशीर पणे रिक्षा ओढून नेल्या जात आहेत अशा फायनान्स कंपनी विरोधात कारवाई करावी यासह इतर विविध मागण्या साठी  महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे  नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्व खाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करून दिवसभर धरणे धरण्यात आले ,  आरटीओ आणि वाहतूक शाखे विरोधात घोषणा देण्यात आल्या

हडपसर गाडीतळ येथे सहा सीटर रिक्षाचालकांने बेकायदेशीर थांबा तयार करून दहा ते पंधरा प्रवासी घेऊन अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहतूक  केली जात आहे याबाबत पुणे आरटीओ आणि पुणे वाहतूक शाखा यांच्या कडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई केली जात नाही हडपसर वाहतूक मार्फत हप्ते घेऊन बिनधास्तपणे ही बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे हडपसर गाडीतळ येथील सहा सीटर चे रिक्षा स्टॅन्ड बंद करावे यांच्या विरोधात कारवाई करावी

पिंपरी चिंचवड येथे आरटीओ कार्यालयात बोगस शाळेचा दाखला आणि खोटे पोलीस वेरिफिकेशन काढून शासनाची आणि हजारो रिक्षा चालकांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणात या कार्यालयातील काही अधिकारी यांचा सहभाग आहे याबाबत चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्या विरोधात कारवाई करावी

महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने या पूर्वी अनियमित कामे केल्या प्रकरणी काही अधिकारी यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही याप्रकरणी संबंधित अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुक्त परवाना दिला जात असून मोठया  प्रमाणात रिक्षा परवाना सोडल्यामुळे कंपनी मधील कामगार सरकारी नोकरदार यांनी रिक्षा परवाने काढून रिक्षा भाड्याने दिल्या आहेत यामुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून रिक्षा व्यवसाय संपत आला आहे रिक्षा चालकांचे घर प्रपंच चालवणे कठीण झाले आहे यामुळे रिक्षाचालकांचे बँक आणि फायनान्स कंपनीचे हप्ते थकले असून हप्ते भरणे देखील मुश्किल झाले आहे यात AU फायनान्स कंपनीच्या वतीने गुंडा मार्फत रिक्षा ओढून नेल्या जात आहेत याप्रकरणी काही रिक्षाचालकांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे परंतु AU फायनान्स वर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, AU फायनान्स कंपनी विरोधात आणि इतर विविध फायनान्स कंपनी विरोधात कारवाई करण्यात यावी,त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले

या वेळी बाबा कांबळे म्हणाले ९ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई येथे रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते यामुळे महाराष्ट्रातील नियोजित बंद मागे घेण्यात आला परंतु आता मात्र रिक्षाचालकांच्या प्रश्नांचा विसर मुख्यमंत्र्यांना पडला असल्याचे बाबा कांबळे यांनी म्हणाले

सकाळी 11 वाजता रिक्षा चालक पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालया वर एकत्र आले आणी  आंदोलनच्या वेळी हवेली तालुका अध्यक्ष सदाशिव पवार पाटील ,  राज्य उपध्यक्ष आनंद तांबे , उमेश  फडतडे , गोविंद नरवडे, गणेश लव्हाळे, विजय निकम, इस्माईल शेख, अर्जुन देशमुख , प्रकाश ढवळे, गौतम बाग्लाने , कैलास जाधव ,सुरज इंदोर ,लाला मस्के, काळू उपाध्येय ,चेतन माळवदकर  ,आण्णा सूर्यवंशी,  रमेश मचाले , आदी उपस्थित होते . जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले