भीमसेन अग्रवाल यांना सर्वोत्कृष्ट बांधकाम क्षेत्रातील महाराष्ट्र भुषण पुरस्कार

Share this News:

पिंपरी : अण्णासाहेब मगर सोशल/ स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी बांधकाम व्यवसायिकांना बांधकाम क्षेत्रातील महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट बांधकाम क्षेत्रातील महाराष्ट्र भुषण म्हणून यंदा पिंपरी चिंचवड मधील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक एस्सेन ग्रुपचे चेअरमन भीमसेन अग्रवाल यांना सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

अण्णासाहेब मगर सोशल/ स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव समारंभ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष गुलाब बिरदवडे यांनी केले होते. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत  एस्सेन  ग्रुप  चे चेअरमन भीमसेन अग्रवाल यांना सर्वोत्कृष्ट बांधकाम क्षेत्रातील महाराष्ट्र भुषण पुरस्काराने स्नमानित करण्यात आले. तसेच यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही गौरव करण्यात आला.

 

पिंपरी चिंचवडचे विश्‍वसनीय वबांधकाम व्यवसायिक म्हणून ऐश्‍वर्यम्  ग्रुप  चे चेयअरमेन भीमसेन अग्रवाल यांना आळखले जाते. यांनी संस्थेच्या वतीने सुमारे 215 ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ व जीएसटी आणि अन्य छुप्या खर्चात सुट मिळवून देत, जो फ्लॅट 25 लाखाचा आहे, तो फक्त सुमारे 19,73000 रूपयात  ग्राहकांना उपलब्ध दिला आला आहे.  आता पर्यंत कन्स्ट्रक्शन मध्ये 6 निवासी प्रोजेक्ट आणि कमर्शियल प्रोजेक्ट ऐस्सन ग्रुप ने बनविले आहे.  ऐश्‍वर्यम्, ऐश्‍वर्यम् कोर्टयार्ड, ऐश्‍वर्यम् कंफर्ट,  ऐश्‍वर्यम् निवारा, ऐश्‍वर्यम् हमारा आणि कमर्शियल मॉल ऐश्‍वर्यम् वून आणि  ऐश्‍वर्यम् कंफर्ट गोल्डचा समावेश आहे. आता पर्यंत एकूण 25 लाख चौ.फुटाचे बांधकाम केले आहे.  3500 फ्लॅटचे हस्तांतरण केले आहे. एकूण 50 लाख चौ.फुटाचे सध्या बांधकाम चालू आहे.

सर्व प्रोजेक्टस् रेरा प्रमाणित आहेत. पिंपरी चिंचवड परिसरात  ऐश्‍वर्यम् नावाचेे साम्राज्यात अनेक चांगले प्रोजेक्ट दिले आहेत. यांचे हे कार्य पाहता महाराष्ट्र भूषण पुरस्कार ऐश्‍वर्यम गु्रपचे चेयअरमेन भीमसेन अग्रवाल यांना प्रदान करण्यात आला आहे.