Bhosari, Alandi BJP corporators to take oath on Shivneri Fort

भोसरी आळंदीतील भाजपा नगरसेवकांचा शुक्रवारी शिवनेरीवर शपथविधी
पिंपरी (दि. 02 मार्च 2017) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भोसरी विधानसभा मतदार संघातून भाजपाचे निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक आणि आळंदी नगरपरिषदेतील भाजपाच्या नगरसेवकांचा शपथविधी समारंभ शुक्रवार दि. 3 मार्च 2017 रोजी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत शिवनेरी गडावर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.
    छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी गडावरील शिवाई मातेच्या मंदिरात सकाळी 7 वाजता हे सर्व नगरसेवक अभिषेक करतील. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पालकमंत्री गिरीष बापट त्यांना एकनिष्ठतेची शपथ देतील. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, राज्य लोक लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, आमदार महेश लांडगे आदी उपस्थित राहणार आहेत. यानंतर आमदार महेश लांडगे यांनी दत्तक घेतलेल्या कुसूर गावातील विकास कामांची माहिती घेणे व विकास प्रकल्पांना भेट देण्यासाठी नगरसेवक सकाळी 9 वाजता जाणार आहेत.