लॉकडाऊन मध्ये पोलीसांकडुन एक हात मदतीचा

Share this News:

27/03/2020, पुणे-  दि.27/03/2020 रोजी 16.30 वा. चे सुमारास इसम नामे अजय नथु साळुंखे रा. राजीव गांधी नगर बिबवेवाडी पुणे यांनी पुणे पोलीस नियंत्रणकक्ष येथे फोन करुन पोलीस मदत पाहिजे असे कळविल्यानंतर नियंत्रण कक्ष येथुन बिबवेवाडी पोलीस ठाणेस त्याप्रमाणे कॉल प्राप्त झाल्याने सदर कॉल करीता पोलीस ठाणेचे डि.ओ. सपोफौ अमृत पाटील व गोपनियचे कर्मचारी पोलीस हवालदार तणपुरे असे पोलीस ठाणेकडील सी.आर.मोबाईल मधुन कॉल पॉईटचे ठिकाणी जावुन नमुद इसमास भेटून त्यांच्या तक्रारी बाबत चौकशी करता त्यांनी सांगितले की, मी कुटूंब प्रमुख असुन माझ्या सोबत माझी पत्नी धनश्री वय 26 मुलगी लावण्या वय 5 वर्षे ,शितल वय -04 वर्षे,परी वय 02 वर्षे व मुलगा दुर्गेश वय 07 वर्षे,पृथ्वीराज वय 01 महिना मी बिगारी काम करतो परंतु लॉकडॉन मुळे कामकाज बंद असल्याने आम्ही उपाशी आहोत कोणीही काही खालेले नाही.

 

आम्हास खाण्यास काहितरी पाहिजे असे कळविल्याने लागलीच सपोफौ  अमृत पाटील, पोलीस हवालदार तणपुरे, पोलीस शिपाई गुजर,सागर,राख यांनी दोन किलो तांदुळ, दोन किला साखर, पावशेर चहा पावडर, बटाटे एक किलो, एक किलो तेलाची पिशवी, एक लिटर दुध, व भाजीपाला तसेच अग्निशामक दलाचे कर्मचारी मंगेश बोंबले यांनी नमुद कुटंूबास 1,000/- रुपये रोख मदत व बिस्कीटचे पुडे अशी मदत केली आहे.

सदरची कामगिरी सहा.पोलीस उपनिरीक्षक अमृत पाटील, पोलीस हवालदार तणपुरे, पोलीस शिपाई गुजर,सागर,राख व अग्निशामक दलाचे कर्मचारी मंगेश बोंबले यांनी केलेली आहे.