विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील, रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान

Share this News:

 

मुंबईदि.24 (रानिआ): रायगडपुणेअहमदनगरहिंगोलीवर्धाभंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमधील नऊ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 16 पंचायत समित्यांमधील 16 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 23 जून 2019 मतदानतर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होईलअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले कीया पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 3 ते 8 जून 2019 या कालावधीत स्वीकारली जातील. 5 जून 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. मतदान 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.

पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत)पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर)अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी)हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी)वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर)भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).

पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळपालघर (पालघर)- खैरापाडाहवेली (पुणे)- वाडेबोल्लाईकागल (कोल्हापूर)- माद्याळदेवळा (नाशिक)- महालपाटणेचाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारेनेवासा (अहमदनगर)- सोनईकर्जत (अहमदनगर)- कोरेगावकेज (बीड)- आडसबिलोली (नांदेड)- अटकळीमाहूर (नांदेड)- वाई बामुखेड (नांदेड)- जांब बु.औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाखगोरेगाव (गोंदिया)- घोटीअर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.

            निवडणूक कार्यक्रमाचा तपशील

•          नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 3 ते 8 जून 2019

•          नामनिर्देशनपत्रांची छाननी- 10 जून 2019

•          अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 15 जून 2019

•          अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 19 जून 2019

•          मतदानाचा दिनांक- 23 जून 2019

•          मतमोजणीचा दिनांक- 24 जून 2019