ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅक ची ए प्लस श्रेणी

पुणे : राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृत परिषदेने (नॅक) ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला ए प्लस श्रेणी दिली आहे. नॅकच्या नविन प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीत सर्वात जास्त गुण मिळणारे डीपीसीओई हे एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.
विद्यार्थ्यांना सर्वांगिण विकासात्मक, गुणवत्तापूर्ण शिक्षण सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असावे असे संस्थेचे धोरण आहे. ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे सन २००८ मध्ये सुरू झाले असून संस्थेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी परदेशात उच्चशिक्षण घेत आहेत. तसेच महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी हे यशस्वी उद्योजक, प्रशासकिय सेवेत आणि प्रतिष्ठीत उद्योग क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.
संस्थेच्या या उज्जवल यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील, सचिव उमा ढोले पाटील यांनी  प्राचार्य डॉ. निहार वाळिंबे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.