अन्याय विरोधात पेठून उठणे व पीडितांना न्याय देणे हेच माझे धर्म अन कर्म समजतो

5/9/19, पुणे : लोकशाहीच्या राज्यात राहून देखील मूळ सवलतीपासून वंचित राहिलेले व पालावर राहून आपल्या पोटाची खळगी भरून जीवन जगणारे तसेच प्रगत दुनिया मध्ये राहून आज देखील ज्या समाजाकडे गुन्हेगार जात म्हणून ओळखले जाते अशी पिडीत समाजाची हाक राज्य शासनाने ऐकावे तसेच समाजावर होणारे अन्याय-अत्याचार विरोधात व विविध समाजाची मागणी संदर्भात आदिवासी पारधी परिवर्तन आघाडी यांच्या वतीने दिनांक 31/08/2019,वार-शनिवार रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन करून विभागीय आयुक्त साहेब पुणे यांना निवेदन देण्यात आले..!

सदर वेळी पारधी समाजाचे नेते शरद सणस पवार,हिरू पांडू शिंदे,उपदेश भोसले,महालिंग भोसले,सि.जि.पवार,पिस्टल पवार,चिरंजीव चव्हाण,ललिता काळे,आकाश जाधव,प्रदीप राठोड,रत्नंजय राठोड व असंख्य पारधी बंधू व भगिनी तसेच इतर बांधव उपस्थित होते.जमलेल्या बांधवाना मार्गदर्शन करताना व त्यांची समस्या जाणून घेताना तसेच एक दिवसीय धरणे आंदोलन मधील काही क्षणचित्रे….!