अग्निशमन जवानाची तत्परता; आगीवर तातडीने नियंत्रण

Share this News:

1/2/2020, पुणे – आज रात्री आठच्या सुमारास काञज, बालाजीनगर येथील उड्डाणपूलावर एका चारचाकी वाहनाने पेट घेतल्याची घटना घडली होती. पण पीएमआरडीए मारुंजी येथे कार्यरत असणारे जवान मयुर गोसावी यांनी ही घटना पाहताच तातडीने आगीवर नियंत्रण मिळवत आपले कर्तव्य चोख बजावले.

बालाजीनगर येथील उड्डाणपूलावर होंडा सिटी कंपनीच्या कारने अचानक पुढील बाजूने पेट घेतला व रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. तेथून घरी जात असलेले पीएमआरडीए जवान गोसावी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निरोधक उपकरणाचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच पुणे अग्निशमन दलाशी संपर्क साधून मदत मागविली. या घटनेत कोणी जखमी नाही.

आग वेळीच विझवल्याने तेथे उपस्थित नागरिकांनी व काञज अग्निशमन केंद्रातील जवान यांनी पीएमआरङीए जवान मयुर गोसावी यांचे कौतुक केले व पीएमआरङीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनीदेखील याची दखल घेत त्यांच्या या जवानाचे विषेश कौतुक केले. जवान मयुर यांचे वडील रामचंद्र गोसावी हे पुणे अग्निशमन दलाच्या मुख्यालयात कार्यरत आहेत.