वेबकास्टींग यंत्रणेची जिल्हाधिकारी राम यांच्याकडून पहाणी

Share this News:

पुणे, दिनांक 21- मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वेबकास्टींगची व्यवस्था करण्यात आली असून या केंद्राची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सकाळी पहाणी केली.

वेबकास्टींगसाठी एकूण 1287 कॅमेरे बसवण्यात आले असून मतदान केंद्रांवर 1243 सीसीटीव्ही कॅमेरे (निकट परिपथ दूरचित्र यंत्रणा) बसवण्यात आहे आहेत.

दूरचित्रवाणीसंचावर त्याची नियमित पहाणी केली जात आहे. यासाठी 21 हून कर्मचारी कार्यरत आहेत. अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे या कक्षाचे प्रमुख आहेत.

जिल्हाधिकारी राम यांनी या व्यवस्थेची पहाणी करुन जिल्हयातील मतदान केंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेतला. पाऊस थांबलेला असल्याने मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा, आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले. “आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.