चला कसब्यात स्वच्छतेची क्रांती घडवूयात – मुक्ता शैलेश टिळक

20/9/19- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघातर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेपासून प्लास्टिक मुक्ती बाबत जनजागृती पर्यंत आणि रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून कसबा विधानसभा मतदार संघात स्वच्छतेचे क्रांती घडेल, असे प्रतिपादन महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक यांनी केले.

 

या सप्ताहाचा एक भाग म्हणून स्वच्छता उपक्रमआणि प्लास्टिक मुक्त अभियान आयोजित करण्यात आले होते. कसबा विधानसभा मतदार संघातील विविध प्रभागांमध्ये स्वच्छता करण्यात आली. २२ स्वच्छता गृहांची स्वच्छता करण्यात आली. तसेच नानापेठ ते अलका टॉकीज चौक, संपूर्ण लक्ष्मी रास्ता या परिसरातील प्लास्टिक जमा करण्यात आले.

 

तसेच परिसरातील कचरा झाडण्यात आला.स्वच्छता अभियानाला रमणबाग शाळा येथून या सुरुवात झाली. घोरपडी पेठ, लक्ष्मी रस्ता, शुक्रवार पेठ आदी प्रभागांमध्ये स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले.

 

नगरसेवक राजेंद्र खेडेकर, राजेंद्र येनपुरे, नगरसेवक धीरज घाटे, नगरसेवक हेमंत रासने यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.