Love Story of Raja Pururava and a celestial Apsara Urvashi , Puneties experienced Celebration of Love and Womanhood

Share this News:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात उर्वशी सेलेब्रेशन ऑफ लव्ह अँड वूमनहूड या नृत्य नाटिकेत मंदिरा मनीष द्वारे वैशिष्ट्यकृत कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. अशा प्रकारच्या नृत्य नाटकातून अप्सरा उर्वशी आणि राजा पुरुरावा यांच्या प्रेमकथेला आधुनिक शैलीने उजाळा दिला.

हा कार्यक्रम एक उत्तम संगीत, नृत्य आणि नाट्य याचा एक मिलाप असून त्याला रंगमंचा वर पाहून रसिकांच्या डोळ्याचे अक्षरशः पारणे फिटले. या कार्यक्रमाचे कथानक कालिदासाच्या ‘विक्रमोर्वशीयम्’ मधील अप्सरा उर्वशी, आणि राजा पुरुरवा यांच्या प्रचलित अशा कथेवर आधारित आहे.हे नाटक स्त्रीच्या अधिकाराची,सत्वाची, आत्मनिर्भरतेची, असीम क्षमतेची, सक्षतेची छबी चित्रित करते. तसेच पुरुष वर्गाला स्त्री बद्दलची विचारसरणी बदलण्यास, तिला सशक्त व स्वतंत्र बनण्यास व प्रयत्न करण्याची दृष्टी देते.त्याच बरोबर तिच्यावर बंधन न लादता, तिच्या अस्तीत्वासाठी, अधिकारांसाठी मदत करण्याची वृत्ती व तिला योग्य सन्मान देण्यास प्रवृत्त करते.

या नाटकाद्वारे आजच्या पिढीला भारतीय संस्कृती, कला, साहित्य ह्यांची ओळख करून द्यायची आहे.तसेच त्यांना सात्विक प्रेमाची जाण करून द्यायची असून प्रेम भावनेच्या खऱ्या परिभाषाचे ज्ञान द्यायचे आहे.

या कथेत इंद्राच्या इर्ष्या, लोभ, वासना या वृतीला समज देण्यासाठी नरऋषी एक उर्वशी नामक सौंदर्यवती उत्पत्ती करतात. आणि तिला इंद्राची दासी बनविले जाते. याच वेळी भरतमुनी तिचा कडून चार वचने घेतात की, कधीही कोणाच्या प्रेमात पडणार नाही,कोणासोबत लग्न करणार नाही,भावनांवर नियंत्रण ठेवणार तसेच संपूर्ण जीवन हे देवांचे देव इंद्र यांना समर्पित करेल.मात्र उर्वशी सुखाच्या उत्सुकतेने दररोज रात्री पृथ्वीवर उतरून राजा पुरूरवला भेटायची.या मुळे ती राजाच्या प्रेमात पडली.राजाच्या भेटीने उर्वशीचे जीवन बदलले आणि त्यावेळी तिने असे क्षण अनुभवले जे की जीवनात प्रथमच तिला अनुभवायला मिळाले.या वेळी ती अशा परिस्थितीत अडकलेली असते की एका बाजूला तिचे प्रेम व दुसऱ्या बाजूला नर ऋषी यांना दिलेले वचने असतात. अशा अनेक रोचक घटनांनी हे नाटक घडत जाऊन प्रेम, त्याग व विश्वासाचे सात्विक दर्शन घडवते.

या नृत्य नाट्यातील उर्वशीचे पात्र अत्यंत जिवंत पणे मंदिरा मनीष या सादर करत आहे. या वयाच्या दहाव्या वर्षा पासून भारत नाट्यम करत असून यांनी देश विदेशात अनेक ठिकाणी आपली नृत्यकला सदर केलेली आहे.या बरोबरच पूर्वा सारस्वत व सोनाली सुर्वे- गावडे यांनी अनुक्रमे मेनका आणि रंभा हि पत्रे साकारली आहे.तसेच राजा पुरूरव यांचे पात्र वृशांक रघटाटे हे साकारणार आहेत.

या कार्यक्रमातून उर्वशीचे पात्र जिवंत ठेवण्याचे व त्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे काम केले आहे. प्रसिध्द संगीतकार अलाप देसाई यांनी याला उत्तम असे संगीत दिलेले आहे. अलाप यांनी संगीतात विविध प्रकारच्या शैलीचा वापर करून,त्यांच्या अनुभवाच्या जोरावर उर्वशीला सुंदररित्या साकारले आहे. हे नृत्यदिग्दर्शन वैभव आरेकर यांनी केले असून याचे दिग्दर्शन सुशांत जाधव यांनी केलेले आहे.या कार्यक्रमात नृत्य आणि संगीताच्या आधारावर उर्वशीचा एक सुंदर जीवन प्रवास रेखाटला गेला आहे.