विसर्जन मिरवणुकीकरीता मिनी हॉस्पिटल, रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची टीम सज्ज 

 
पुणे 12/9/2019 : निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे गणेश विसर्जन मिरवणूक काळात होणा-या गर्दीच्या ठिकाणी येणारी आपत्ती विचारात घेऊन गणेशभक्तांना आणि बंदोबस्तावरील पोलिसांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी मिनी हॉस्पिटल, डॉक्टरांची टीम आणि रुग्णवाहिका गुरुवार, दिनांक १२ आणि शुक्रवार, दिनांक १३ सप्टेंबर रोजी सज्ज असणार आहे.
मिनी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे, इंजेक्शन, सलाईन, बेड यांसह अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महिलांकरीता स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीकरीता सर्व यंत्रणेसह १० डॉक्टर व ४ परिचारिकांची टीम सज्ज आहे. हॉस्पिटलजवळ रुग्णवाहिका देखील सज्ज असणार आहे. तसेच शनिवारवाडयाजवळील सूर्य सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आत्पकालिन परिस्थितीकरीता सर्व यंत्रणा उपलब्ध आहे. तरी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांसह गणेशभक्तांनी मिनी हॉस्पिटलमधील विनामूल्य आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले.

 विसर्जन मिरवणूक आपत्कालीन सेवेसाठी मिनी हॉस्पिटल, रुग्णवाहिका व डॉक्टरांचे संपर्क क्रमांक
१) डॉ. व्ही. के आंबेगावकर :- ९४२२५०२०९९
२) डॉ. सुजाता बरगाले :- ७३८५७५४४९९
३) उदय पाटील (सुर्य- सह्याद्रि हॉस्पिटल):- ९८५०६४०९२९
४) जयेश कासट :- ८००७८८४४८३
५) सूर्य सह्याद्री हॉस्पिटल आत्पकालिन सेवा क्रमांक :- ०२०-२४५१३९१८