आमदार महेश लांडगे यांची विविध सोसायट्यांना भेट; सोसायट्यांमधील समस्या सोडविण्याचे आमदार लांडगे यांचे संबंधितांना आदेश

Share this News:

भोसरी, ७ जुलै : मोशी-देहू मार्गावरील अनेक सोसायट्यांमधील नागरिकांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे समस्यांचा पाढा वाचला. महेश लांडगे यांनी नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित विभागाचे अधिकारी आणि विकासकांना तक्रारी निवारण्याचे आदेश दिले. आमदार लांडगे यांनी आज (रविवारी) परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये प्रशासकीय अधिका-यांसोबत नागरिकांच्या भेटी घेतल्या.

 

आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या भेटी दौ-यावेळी नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेविका अश्विनी जाधव, युवा नेते नितीन बो-हाडे, मंगेश हिंगणे, महापालिका अतिक्रमण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पवार, स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता जे डी जाधव, चिखली मोशी फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे आदी उपस्थित होते.

 

सोसायट्यांमध्ये पार्किंगची समस्या आहे. यासोबतच सोलर, सोसायटी शेड, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा यांसारख्या समस्या नागरिकांना सतावत आहेत. जोपर्यंत विकासकाकडून नागरिकांकडे सोसायटी हस्तांतरित होत नाही, तोपर्यंत विकासकाने पाणीपुरवठा करायचा आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

स्पिरा सोसायटी, आकाशवेध, कोलासस, साहिल फॉर्च्युन, इमॅजिका, गंधर्व एक्सलन्स, स्पर्श, आयडियल, दिगंबरा आदी सोसायट्यांना आमदार लांडगे यांनी भेट दिली. संबंधित सोसायट्यांच्या विकासकांसोबत सोसायटींना भेट दिली. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची पाहणी करून संबंधितांना त्या सोडविण्याचे आदेश आमदार महेश लांडगे यांनी दिले.