2 ते 4 जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज   

Share this News:
  1. मुंबई, दि. 30: बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दि. 2 ते 4 जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, पूर्व-अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

या जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील इतर भागांत पावसाचे प्रमाण कमी राहील. या दरम्यान पश्चिम-विदर्भाच्या जवळ असलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. उर्वरित मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि खान्देशात मात्र प्रामुख्याने हलका पाऊस पडेल, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

या दरम्यान ढगाळी वातावरणामुळे या सर्व भागांतील तापमान कमी होतील. 4 जुलै नंतर पुढच्या काही दिवसात पावसाचे प्रमाण कमी होईल. दि.24 जुलै मध्ये नदी-नाल्यांच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांनी पुरा सारखी स्थिती उद्भविल्यास सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.