राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल :रोज १ हजार पूरग्रस्त रुग्णांवर उपचार

Share this News:

16 /8/19,पुणे:

पूर ओसरल्यावर येणाऱ्या साथींच्या आजारापासून नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय मदतीसाठी,तसेच सर्व प्रकारच्या तातडीच्या उपचारांसाठी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल कोल्हापूर -सांगली भागात १२ ऑगस्ट पासून कार्यरत असून रोज १ हजार रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, पुणे शहराध्यक्ष डॉ सुनील जगताप यांनी  दिली.

पूर परिस्थिती मुळे त्वचारोग ,सर्दी -ताप ,उलट्या -जुलाब यावर उपचार करावे लागत असल्याचे डॉ जगताप यांनी सांगितले .

एकूण ३०० डॉक्टर्स नी या रुग्णसेवेसाठी नोंदणी केली आहे . पुण्याहून रोज २५ डॉक्टर सांगली -कोल्हापूर भागात पुरग्रस्तांच्या उपचारासाठी जात आहेत . कात्रजवरून ने -आण करण्यासाठी रोज बस सुविधा सेल तर्फे करण्यात आली आहे . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वैद्यकीय पथकांची आणि पूरग्रस्त गावांची सांगड घालून दिली असून नियोजनबद्ध सेवाकार्य सुरु आहे .

१२ ऑगस्ट रोजी एस.एम. जोशी फाऊंडेशन , पुणे येथे रुग्णवाहिकाना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा झेंडा दाखवून पूरग्रस्त भागात रवाना केले  होते .

सांगली,कोल्हापुर परिसरामध्ये पावसामुळे भयानक परिस्थिती उदभवली .पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे रेस्क्यू ऑपरेशन नंतर ,पूर ओसरला कि विविध आजार पसरण्यास सुरुवात होण्याची श्यक्यता लक्षात घेऊन  गावागावात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत चे नियोजन  राष्ट्रवादी  डॉक्टर सेल ने केले  .तसे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल ने केले  . ३०० डॉक्टर्सनी या सेवा कार्यासाठी वेळ देण्याचे ठरवले .

८ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉक्टर्स सेलने मदतकार्य करावे ,असे सुचवून मार्गदर्शन केले होते. त्यासाठी औषधांची उपलब्धता व लागणारे सर्व सहकार्य पक्षा तर्फे उपलब्ध केले जात आहे. त्याच बरोबर पुरग्रस्त भागातील स्थानिक डॉक्टर्सशी समन्वय साधून सक्षम आपत्कालीन आरोग्य यंत्रणा राष्ट्रवादी डाँक्टर सेल उभी केली आहे. त्या साठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व आ. जगन्नाथ शिंदे मदत करत आहे.

खा.शरद पवार , .आ. जयंत पाटील स आ. अजितदादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे, आ. जगन्नाथ शिदे व डॉ. नरेंद्र काळे (डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष), डॉ. सुनील जगताप( डॉक्टर सेल अध्यक्ष पुणे), डॉ. शिवदीप उंद्रे, डॉ. राजेश पवार (कार्याध्यक्ष पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले .