“काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या पाठिंबा संदर्भात रिपब्लिकन जनशक्तीचा काहीही संबंध नाही”

रिपब्लिकन जनशक्तीचे  मा. अर्जुन डांगळे

रिपब्लिकन जनशक्तीचे  मा. अर्जुन डांगळे यांच्या नेतृत्वाखालील  पक्ष असून ,सन २०१४ च्या विधानसभे पासून शिवसेनेचा मित्र पक्ष आहे. व आत्ता या लोकसभा निवडणुकीत सुद्धा शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणून सोबत असून या पक्षाचा कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांशी कोणताही संबंध नाही.काल मुंबई येथे माध्यमासमोर  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या पाठिंबा संदर्भात काही पक्ष संघटनेचा उल्लेख करताना अर्जुन डांगळे यांच्या नावाचा केलेला उल्लेख चुकीचा असून अर्जुन डांगळे व रिपब्लिकन जनशक्तीचा काहीही संबंध नाही .

तसेच जनतेने व कार्यकर्त्यांनी चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.आम्ही भाजप शिवसेना रिपब्लिकन जनशक्ती युतीच्या माध्यमातुन युतीचे महाराष्ट्रातील लोकसभेचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन जनशक्तीचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात सहभाग घेणार आहे . असे रिपब्लिकन जनशक्तीचे पक्ष अध्यक्ष  मा. अर्जुन डांगळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी या पत्राद्वारे कळविले आहे .